शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल

By शेखर पाटील | Published: August 23, 2018 11:29 AM

ओप्पो कंपनीने आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त असणारा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

ओप्पो कंपनीने आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त असणारा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

ओप्पो ए ५ हा स्मार्टफोन आधी चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हेच मॉडेल भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. याची खासियत म्हणजे यात आर्टीफिशियल इंटिलेजीयन्सयुक्त कॅमेर्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. ओप्पोने या आधीदेखील अनेक सेल्फी स्पेशल कॅमेर्‍यांनी युक्त मॉडेल्स सादर केले आहेत. ओप्पो ए ५ या मॉडेलमध्येही अतिशय दर्जेदार फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. खरं तर मेगापिक्सल्सच्याबाबत विचार केला असता यापेक्षा अनेक सरस मॉडेल्स उपलब्ध आहेत. तथापि, या कॅमेर्‍यामध्ये एआय ब्युटी टेक्नॉलॉजी २.० या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने तब्बल २९६ फेशियल पॉइंटस् ओळखण्याची क्षमता याला प्रदान करण्यात आली आहे. यामुळे यातून अतिशय दर्जेदार सेल्फी प्रतिमा घेता येणार असल्याचे ओप्पो कंपनीने नमूद केले आहे. तर याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या अंतर्गत एफ/२.२ अपर्चरयुक्त १३ मेगापिक्सल्सचा तर एफ/२.४ अपर्चरयुक्त २ मेगापिक्सल्सचे कॅमेरे दिलेले आहेत. यातून अगदी सजीव वाटणार्‍या प्रतिमा घेता येणार आहेत. यामध्ये ४,२३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली असून ती तब्बल १४ तासांचा व्हिडीओ बॅकअप देणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ वर आधारित कलरओएस ५.१ या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे. 

ओप्पो ए ५ या स्मार्टफोनमध्ये ६.२ इंच आकारमानाचा नॉचयुक्त एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे. हा डिस्प्ले एचडी प्लस अर्थात १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण असणार आहे. तसेच याचा अस्पेक्ट रेशो १९:९ असा असेल. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४५० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. या मॉडेलचे मूल्य १४,९९० रूपये असून देशभरातील शॉपीजमधून याला उपलब्ध करण्यात येणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल