व्हॅलेंटाईन डे निमित्त ॲपलचं खास सरप्राईज! iPhone, MacBook आणि iPad वर मिळतेय मोठी सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:45 IST2026-02-11T13:41:23+5:302026-02-11T13:45:43+5:30

Apple Valentines Day Sale 2026: ॲपलने भारतात आपला खास व्हॅलेंटाईन डे सेल सुरू केला आहे. आयफोन १७ सिरीजपासून ते शक्तिशाली मॅकबुकपर्यंत, सर्वच उत्पादनांवर भरघोस बँक ऑफर्स मिळत आहेत.

Apple Valentine's Day Sale 2026: Massive Instant Cashback on iPhone 17 Series, MacBooks, and Apple Watch in India | व्हॅलेंटाईन डे निमित्त ॲपलचं खास सरप्राईज! iPhone, MacBook आणि iPad वर मिळतेय मोठी सूट

व्हॅलेंटाईन डे निमित्त ॲपलचं खास सरप्राईज! iPhone, MacBook आणि iPad वर मिळतेय मोठी सूट

'व्हॅलेंटाईन डे'चे औचित्य साधून टेक दिग्गज ॲपलने भारतीय ग्राहकांसाठी आपला खास सेल जाहीर केला. या सेलमध्ये आयफोन, मॅकबुक, आयपॅड आणि ॲपल वॉच खरेदी करणाऱ्यांना हजारो रुपयांची बचत करण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे, यावेळी किंमतीत थेट कपात करण्याऐवजी ॲपलने इन्स्टंट बँक कॅशबॅकवर भर दिला आहे.

हा सेल सध्या ॲपल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह आहे. ग्राहक ऑनलाइन ऑर्डर करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. पेमेंट करताना पात्र बँक कार्ड वापरल्यास कॅशबॅकची रक्कम त्वरित वजा केली जाते, ज्यामुळे उत्पादनाची किंमत कमी होते.या सेलसाठी ॲपलने आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि अमेरिकन एक्सप्रेससोबत भागीदारी केली आहे. या बँकांच्या कार्डवर ग्राहकांना त्वरित कॅशबॅक मिळत आहे.

मॅकबुकवर सर्वात मोठा धमाका 

-मॅकबुक एअर (१३-इंच, M4 चिप): मूळ किंमत ₹९९,९०० असली तरी, १० हजारांच्या कॅशबॅकनंतर हा मॅकबुक ८९,९०० मध्ये उपलब्ध आहे.
- मॅकबुक एअर (१३-इंच, M4 चिप): १,६९,९०० ऐवजी आता ₹१,५९,९०० मध्ये मिळेल.
- मॅकबुक एअर (१३-इंच, M4 Pro चिप): या प्रीमियम मॉडेलची प्रभावी किंमत २,३९,९०० झाली आहे.

iPhone 17 सिरीजवर आकर्षक ऑफर्स

- आयफोन १७ प्रो. मॅक्स: प्रभावी किंमत ₹१,४९,९०० रुपये
-आयफोन १७ प्रो: प्रभावी किंमत ₹१,२४,९०० रुपये
-आयफोन १७ एअर: हा फोन आता ₹१,१४,९०० मध्ये खरेदी करता येईल
-आयफोन १७: ५ हजारांच्या कॅशबॅकसह ७७,९०० मध्ये उपलब्ध

ॲपल वॉच आणि वेअरेबल्सवरही सूट

- ॲपल वॉच सीरिज ११: खरेदीवर ४ हजारांची सूट
-ॲपल वॉच एसई ३: बजेट फ्रेंडली वॉचवर २ हजारांची सूट

Web Title : ऐपल का वैलेंटाइन डे धमाका: iPhones, MacBooks, iPads पर छूट!

Web Summary : ऐपल ने भारत में वैलेंटाइन डे सेल की घोषणा की, जिसमें iPhones, MacBooks, iPads और Apple Watches पर तत्काल कैशबैक मिल रहा है। ICICI, Axis और American Express बैंक कार्ड के माध्यम से Apple इंडिया की वेबसाइट पर छूट उपलब्ध है। MacBook Air, iPhone 17 सीरीज़ और Apple Watch मॉडल पर भारी बचत हो रही है।

Web Title : Apple's Valentine's Day Sale: Discounts on iPhones, MacBooks, iPads!

Web Summary : Apple unveils Valentine's Day sale in India, offering instant cashback on iPhones, MacBooks, iPads, and Apple Watches. Discounts are available through ICICI, Axis, and American Express bank cards via Apple India's website. Significant savings on MacBook Air, iPhone 17 series, and Apple Watch models are highlighted.