Apple सुस्साट! 4G, 5G ला विसरा आता 6G येणार; कंपनी लवकरच सुरू करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 07:50 PM2021-02-22T19:50:55+5:302021-02-22T19:53:07+5:30

Apple 6G News : तंत्रज्ञानाच्या दिग्गज कंपनीने या आठवड्यात नेक्स्ट जनरेशन नेटवर्क तंत्रज्ञानासाठी वायरलेस सिस्टीम रिसर्च इंजिनिअर्स शोधणे सुरू केलं आहे.

apple planning to enter 6g wireless technology job postings revealed 6 | Apple सुस्साट! 4G, 5G ला विसरा आता 6G येणार; कंपनी लवकरच सुरू करणार काम

Apple सुस्साट! 4G, 5G ला विसरा आता 6G येणार; कंपनी लवकरच सुरू करणार काम

googlenewsNext

नवी दिल्ली - अ‍ॅपलने (Apple) आपल्या नव्या उत्पादनांची सीरिज लाँच करत असतं. यानंतर आता अ‍ॅपल 6G वायरलेस तंत्रज्ञान विकसित करण्याची तयारी करत आहे. कंपनीने सध्याच पहिली 5G सपोर्ट असलेली iPhone सीरीज iPhone 12 च्या रुपात सुरू केली आहे. त्यानंतर आता कंपनी सहाव्या पिढीच्या सेल्युलर कनेक्टिव्हिटी म्हणजेच 6G वर काम सुरू करण्याची तयारी दर्शवl आहे. अ‍ॅपलने इंटेल प्रोसेसरला त्याच्या मॅकबुक मालिकेत बदलण्यासाठी स्वत: ची M1 चिप तयार केली आणि आता 6G विकसित करण्याची कंपनीची तयारी दर्शवली असून यामुळे अ‍ॅपल कोणावरही अवलंबून राहू निश्चित असल्याचं स्पष्ट होत आहे. 

तंत्रज्ञानाच्या दिग्गज कंपनीने या आठवड्यात नेक्स्ट जनरेशन नेटवर्क तंत्रज्ञानासाठी वायरलेस सिस्टीम रिसर्च इंजिनिअर्स शोधणे सुरू केलं आहे. कंपनीने या नोकरीसाठी जाहिरात देखील दिली आहे. या सूचनेनुसार नोकरी सिलिकॉन व्हॅली आणि सॅन डिएगो येथील अ‍ॅपलच्या कार्यालयांसाठी आहेत. जिथे कंपनी वायरलेस तंत्रज्ञान आणि चिप डिझाइनवर काम करते. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने निवडलेले लोक रेडिओ अ‍ॅक्सेस नेटवर्कसाठी वायरलेस कम्युनिकेशन सिस्टमची पुढील पिढी डिझाइन आणि रिसर्च करणार आहेत. 

6G पूर्णपणे येण्यास सुमारे 10 वर्षांचा कालावधी

इंडस्ट्री एक्सपर्ट्सच्या मते 6G पूर्णपणे येण्यास सुमारे 10 वर्षांचा कालावधी घेईल. मात्र नोकरीच्या सूचीतून नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अ‍ॅपल लवकरच विकासात सहभागी होऊ इच्छित असल्याचं स्पष्ट होत आहे. पण सध्या कंपनीच्या प्रवक्त्यांनी या संदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला आहे. 5G पेक्षा 6G किती वेगवान असणार याबाबतही कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र काही तज्ज्ञांनी हे तंत्रज्ञान 5G पेक्षा 100 पट वेगवान असू शकतं असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

इकडे 5G साठी रडके तोंड! चीन, अमेरिकेत 1000 Gbps स्पीडच्या 6G ची चाहूल

भारतात 5G नेटवर्क लाँचिंग दूर, त्यासाठी साधी चर्चा सुरु झालेली नाहीय. तर दुसरीकडे भारताचा कट्टर विरोधक बनलेल्या चीन आणि मित्रदेश अमेरिकेत 6G लाँच करण्याची तयारी सुरु झाली आहे. चीन तर गेल्या मोठ्या काळापासून 6G वर काम करत आगे. चीनच्या हुवाई कंपनीचे 6G रिसर्च सेंटर कॅनडामध्ये आहे. तिथे हे तंत्रज्ञान जवळपास विकसित होत आले आहे. महत्वाचे म्हणजे, चीनने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 6G ट्रांसमिशनसाठी एअरवेव्हजच्या टेस्टिंगसाठी एक सॅटेलाईट देखील लाँच केल्याचे अहवालात म्हटले आहे. आता चीनची कंपनी ZTE ने देखील यूनिकॉम हॉन्ग-कॉन्गसोबत मिळून 6G वर काम करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे भारतात 2021 च्या अखेरीस 5जी च्या स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. संसदीय समितीने तसा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भारतात 2022 मध्ये सुरुवातीला काही लोकांसाठी तर नंतर इतरांसाठी 5जी लाँच केले जाणार आहे. रिलायन्स जिओने तर यंदा जुलैपासून 5जीची ट्रायल घेण्याची घोषणा केली होती. मात्र, आता जिओला हे वर्ष थांबावे लागण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: apple planning to enter 6g wireless technology job postings revealed 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.