फोन पे, गुगल पे चे दिवस संपले...! आयफोन वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज! भारतात लवकरच येतंय 'Apple Pay'; पाहा कधी होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 09:28 IST2026-02-27T09:27:23+5:302026-02-27T09:28:35+5:30

Apple Pay Launch in India: अ‍ॅपल पे २०२६ च्या मध्यापर्यंत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. आयफोन युजर्सना आता युपीआय आणि एनएफसीद्वारे सुरक्षित डिजिटल पेमेंट करता येणार आहे. वाचा सविस्तर माहिती.

Apple Pay Launch in India: The days of Phone Pay, Google Pay are over...! Good news for iPhone users! 'Apple Pay' is coming soon to India; See when it will be launched | फोन पे, गुगल पे चे दिवस संपले...! आयफोन वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज! भारतात लवकरच येतंय 'Apple Pay'; पाहा कधी होणार लाँच

फोन पे, गुगल पे चे दिवस संपले...! आयफोन वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज! भारतात लवकरच येतंय 'Apple Pay'; पाहा कधी होणार लाँच

भारतातील वाढत्या डिजिटल पेमेंट क्रांतीमध्ये आता जगातील दिग्गज टेक कंपनी 'अ‍ॅपल' मोठी झेप घेण्यास सज्ज झाली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, 'अ‍ॅपल पे' सेवा भारतात लाँच होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ताज्या अहवालानुसार, २०२६ च्या मध्यापर्यंत अ‍ॅपल आपली ही सेवा भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे सुरू करण्याची दाट शक्यता आहे.

भारतात सध्या गुगल पे, फोनपे आणि पेटीएम यांचे वर्चस्व आहे. मात्र, अ‍ॅपल पे आपल्या 'सिक्युरिटी' आणि 'प्रायव्हसी' या वैशिष्ट्यांमुळे आयफोन वापरकर्त्यांसाठी अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

कॅशलेस आणि कार्डलेस पेमेंट: वापरकर्ते त्यांच्या आयफोन किंवा अ‍ॅपल वॉचच्या मदतीने स्टोअरमध्ये विनास्पर्श पेमेंट करू शकतील. अ‍ॅपल पे प्रत्यक्ष कार्ड नंबर शेअर न करता 'टोकनायझेशन' तंत्रज्ञानाचा वापर करते, ज्यामुळे व्यवहाराची सुरक्षा वाढते. ही सेवा एनएफसी तंत्रज्ञानावर आधारित असेल, ज्यामुळे टॅप-टू-पे सुविधा अधिक सुलभ होईल.

भारतीय बँकांशी चर्चा सुरू
अ‍ॅपल पे भारतात सुरू करण्यासाठी कंपनी काही प्रमुख भारतीय बँका आणि एनपीसीआय (NPCI) सोबत चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. भारतीय नियमांनुसार डेटा लोकलायझेशन आणि युपीआय इंटिग्रेशन यावर विशेष भर दिला जात आहे. जर सर्व तांत्रिक प्रक्रिया सुरळीत पार पडल्या, तर २०२६ च्या जून-जुलै महिन्यापर्यंत आयफोन युजर्सना हे नवीन फिचर वापरता येईल.

Web Title : भारत में एप्पल पे लॉन्च होने को तैयार, PhonePe, Google Pay को टक्कर!

Web Summary : एप्पल पे 2026 के मध्य तक भारत में लॉन्च होने की संभावना है, जो Google Pay और PhonePe को टक्कर देगा। यह iPhone उपयोगकर्ताओं के लिए बेहतर सुरक्षा और गोपनीयता प्रदान करता है, साथ ही संपर्क रहित भुगतान और टोकेनाइजेशन की सुविधा भी है। एप्पल भारतीय बैंकों और NPCI के साथ UPI एकीकरण और डेटा स्थानीयकरण के लिए बातचीत कर रहा है।

Web Title : Apple Pay set to launch in India, challenging PhonePe, Google Pay.

Web Summary : Apple Pay is likely launching in India by mid-2026, challenging Google Pay and PhonePe. It offers enhanced security and privacy for iPhone users with contactless payments and tokenization. Apple is in talks with Indian banks and NPCI for UPI integration and data localization.

टॅग्स :Apple Incअॅपल