सर्वात स्वस्त 5G iPhone; नवीन दमदार प्रोसेसरसह ‘वॉटरप्रूफ’ Apple iPhone SE (2022) लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: March 9, 2022 12:17 PM2022-03-09T12:17:12+5:302022-03-09T12:17:22+5:30

Apple iPhone SE (2022): नवीन iPhone SE (2022) एका कॉम्पॅक्ट डिजाईनसह बाजारात आला आहे. हा फोन एंट्री लेव्हल आयफोनचं काम करेल आणि फर्स्ट टाइम युजर्सना आयफोनचा अनुभव देईल.  

Apple iPhone SE 2022 Launched With A15 Bionic Chip Price Specifications Features And More  | सर्वात स्वस्त 5G iPhone; नवीन दमदार प्रोसेसरसह ‘वॉटरप्रूफ’ Apple iPhone SE (2022) लाँच 

सर्वात स्वस्त 5G iPhone; नवीन दमदार प्रोसेसरसह ‘वॉटरप्रूफ’ Apple iPhone SE (2022) लाँच 

Next

Apple नं काल रात्री आपल्या ‘Peek Performance’ इव्हेंटच्या माध्यमातून नवीन iPhone SE (2022) सादर केला आहे. यात फ्लॅगशिप iPhone 13 Series मधील A15 Bionic चिप देण्यात आली आहे. डिजाईन मात्र जुन्या आयफोन सारखीच आहे. हा कॉम्पॅक्ट फोन 5G कनेक्टिव्हिटीसह फर्स्ट टाइम युजर्सना आकर्षित करण्यासाठी सादर करण्यात आला आहे.  

Apple iPhone SE (2022) ची किंमत  

Apple iPhone SE (2022) ची किंमत यूएसमध्ये 429 डॉलर (सुमारे 33,000 रुपये) बनते आहेत. परंतु भारतीयांना मात्र या फोनच्या 64GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलसाठी 43,900 रुपये मोजावे लागतील. डिवाइस 128GB आणि 256GB स्टोरेज मॉडेलमध्ये देखील येतो. iPhone SE (2022) भारतात 11 मार्चपासून प्री-ऑर्डर करता येईल तर 18 मार्चपासून याची विक्रीत सुरु होईल.  

Apple iPhone SE (2022) चे स्पेसिफिकेशन्स 

Apple iPhone SE (2022) ची डिजाईन जुन्या iPhone 8 सारखी आहे. या आयफोनच्या बॅक आणि फ्रंटला देण्यात आलेली ग्लास कोणत्याही स्मार्टफोनमधील सर्वात मजबूत ग्लास आहे. सिक्योरिटीसाठी यात Touch ID देण्यात आली आहे. तसेच यातील IP67 रेटिंग पाणी आणि धुळीपासून वाचवते. हा डिवाइस Red, Black आणि White कलर ऑप्शन्समध्ये विकत घेता येईल.   

Apple iPhone SE (2022) मध्ये गेल्यावर्षी आलेल्या फ्लॅगशिप iPhone 13 सीरिजच्या A15 Bionic प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या पावरफुल चिपसेटसह कंपनीनं 5G कनेक्टिव्हिटी देखील दिली आहे. हा फोन iOS 15 वर चालेल, तसेच यात फोकस मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनच्या मागे 12MP चा सिंगल कॅमेरा आहे, जो Deep Fusion, Smart HDR 4 आणि फोटो स्टाईलला सपोर्ट करतो. यात चांगली व्हिडीओ रेकॉर्डिंग क्वॉलिटी मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे.  

हे देखील वाचा:

Web Title: Apple iPhone SE 2022 Launched With A15 Bionic Chip Price Specifications Features And More 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.