Apple Event iphone 13: अ‍ॅपलकडून आयफोन १३ सीरिज लॉन्च; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स अन् किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 11:56 PM2021-09-14T23:56:44+5:302021-09-15T00:13:55+5:30

Apple Event iphone 13: अ‍ॅपलकडून बहुप्रतिक्षित १३ सीरीज लॉन्च; फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स

apple iphone 13 launched from price and design to features all you need to know | Apple Event iphone 13: अ‍ॅपलकडून आयफोन १३ सीरिज लॉन्च; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स अन् किंमत

Apple Event iphone 13: अ‍ॅपलकडून आयफोन १३ सीरिज लॉन्च; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स अन् किंमत

Next

कॅलिफॉर्निया: जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनीनं आयफोनची बहुप्रतिक्षित १३ सीरीज लॉन्च केली आहे. दमदार फीचर्ससह आयफोन १३ सीरिज सादर करण्यात आली आहे. यात एकूण ४ फोन आहेत. स्लीक डिझाईन, ऍडव्हान्स कॅमेरा, जगातील सर्वात वेगवान सीपीयू ही आयफोन १३ ची वैशिष्ट्यं आहेत. नव्या फोनमध्ये ए१५ बायॉनिक चिपसेट आहे. त्यामुळे हा फोन प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ५० टक्के अधिक वेगानं चालेल असा कंपनीचा दावा आहे.

आयफोन १३ मध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आली आहेत. स्लीक डिझाईन, ऍडव्हान्स ड्युएल कॅमेरा सिस्टम असलेला हा फोन पाच रंगांमध्ये (गुलाबी, लाल, निळ्या, मिडनाईट, स्टारलाईट) उपलब्ध असेल. यामधीय ब्राईटनेस २८ टक्के जास्त असेल. आयफोन १३ सीरिजमध्ये एकूण ४ फोन (आयफोन १३, आयफोन १३ मिनी, आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्स) आहेत. या फोनमध्ये ओएलईडी आणि सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय शक्तिशाली ए१५ बायॉनिक चिप असेल.

आयफोन १३ मध्ये आणखी काय?
- ६ कोर सीपीयू. आतापर्यंत कोणत्याही स्मार्टफोनमध्ये इतक्या क्षमतेचा सीपीयू देण्यात आलेला नाही.
- ४ कोर जीपीयू. त्यामुळे ग्राफिक्स वेगवान होणार. १५.८ ट्रिलियन ऑपरेशन प्रति सेकंद क्षमता.
- पॉवरफुल कॅमेरा सेटअपमुळे कोणत्याही परिस्थितीत उत्तम फोटो.
- आयफोन १३ मध्ये ड्युएल रियर कॅमेरा. १२ मेगापिक्सल वाईड आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड सेन्सर. सिनेमॅटिक मोडची सुविधा.
- ऑटोमॅटिक फोकस बदलण्याची सुविधा
- फोनमध्ये आधीच्या तुलनेत जास्त चांगली बॅटरी. आधीच्या तुलनेत २.५ तास जास्त चालणार. 
- आयफोन १३ मिनीची किंमत ६९९ डॉलर; आयफोन १३ ची किंमत ७९९ डॉलर; आयफोन १३ प्रोची किंमत ९९९ डॉलर, आयफोन १३ प्रो मॅक्सची किंमत १०९९ डॉलर
- आयफोन १३ हा १२८, २५६ आणि ५१२ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल
- प्रो मॉडेल ४ फिनिशमध्ये उपलब्ध असेल. कंपनीनं फ्रंट पूर्णपणे नव्यानं डिझाऊन केला आहे. नॉच आधीच्या तुलनेत लहान करण्यात आला आहे. 
- आयफोन १३ प्रोमध्ये कंपनीनं कॅमेरा सिस्टममध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल केला आहे. यात टेलिफोटो, वाईड आणि एक अन्य कॅमेरा सेन्सर दिला आहे.

Web Title: apple iphone 13 launched from price and design to features all you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Apple Incअॅपल