31,000 रुपयांमध्ये iPhone 11; आतापर्यंतच्या बेस्ट किंमतीत Amazon सह Flipkart वरही उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 11:50 AM2022-02-05T11:50:22+5:302022-02-05T11:51:28+5:30

Apple iPhone 11 Price In India: Apple iPhone 11 आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट किंमतीत Amazon आणि Flipkart वर उपलब्ध झाला आहे.  

Apple iPhone 11 Selling At Best Price Of Rs 31000 On Amazon And Flipkart  | 31,000 रुपयांमध्ये iPhone 11; आतापर्यंतच्या बेस्ट किंमतीत Amazon सह Flipkart वरही उपलब्ध 

(सौजन्य: PHUC PHAM)

googlenewsNext

Apple iPhone 11 लाँच होऊन जरी काही वर्ष गेली असली तरी हा भारतातील एक लोकप्रिय आयफोन आहे. 2019 मध्ये लाँचच्या वेळी या फोनची किंमत 64,900 रुपये ठेवण्यात आली होती. आता हा फोन 49,900 रुपयांमध्ये विकला जात आहे. जरी प्राईस कट झाला असला तरी ही किंमत अनेक भारतीयांसाठी किफायतशीर म्हणता येत नाही. परंतु Flipkart आणि Amazon वर हा फोन अनेक ऑफर्समुळे स्वस्तात विकत घेता येत आहे. 

अ‍ॅमेझॉनवरील ऑफर 

तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून आयफोन 11 वर 15,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. त्यामुळे iPhone 11 ची किंमत 34,900 रुपयांवर येईल. तसेच 4,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्ही ICICI बँकेचं क्रेडिट आणि डेबिट कार्ड, Kotak आणि SBI बँकेचं क्रेडिट कार्ड वापरू शकता. जर ऑफर्समधील संपूर्ण डिस्काउंट मिळाला तर हा फोन अ‍ॅमेझॉनवरून 30,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

फ्लिपकार्टवरील ऑफर 

iPhone 11 फ्लिपकार्टवर 49,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु जुना फोन एक्सचेंज करून 18,850 रुपयांचा बचत करता येईल. म्हणजे या फोनची प्रभावी किंमत 31,050 रुपये होते. तसेच जर तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर करून हा स्मार्टफोन विकत घेतला तर तुम्हाला खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.  

हे देखील वाचा:

Jio घालणार Laptop सेगमेंटमध्ये धुमाकूळ, कमी किंमतीत भारी फीचर्ससह येतोय JioBook

यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट

Web Title: Apple iPhone 11 Selling At Best Price Of Rs 31000 On Amazon And Flipkart 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.