यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट

By सिद्धेश जाधव | Published: February 4, 2022 06:19 PM2022-02-04T18:19:22+5:302022-02-04T19:35:34+5:30

भारतात अनेक डेटिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत यात Bumble आणि फेसबुकच Truly Madly अ‍ॅप जास्त लोकप्रिय आहेत. तसेच अजून अनेक डेटिंग अ‍ॅप्स प्रेम फुलवण्याचं काम करत आहेत.

डेटिंग अ‍ॅप म्हटलं की लोकांच्या डोक्यात पाहिलं नाव टिंडरच येतं. परंतु त्यापेक्षाही अनेक अ‍ॅप्स भारतात उपलब्ध आहेत. यात फेसबुकच्या अ‍ॅपचा देखील समावेश आहे. चला जाणून घेऊया देशातील बेस्ट डेटिंग अ‍ॅप्स जे तुम्हाला येणाऱ्या व्हॅलेंटाईन डेची डेट मिळवून देतील.

टिंडर 2012 मध्ये लाँच झालेला डेटिंग अ‍ॅप आहे, परंतु याने भारतात 2016 मध्ये पदार्पण केलं. यात स्वाईप अँड सिलेक्ट फिचर मिळत. यातील बेसिक फिचर मोफत आहेत, परंतु टिंडर प्लस आणि गोल्डमध्ये पैसे भरून जास्त फिचर मिळवता येतात.

ट्रूली मॅडलीची निर्मितीच भारतीयांचा विचार करून करण्यात आली आहे. तुमच्या ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या आवडी-निवडी तुमच्याशी मिळत्या-जुळत्या आहेत अशांना तुम्ही या अ‍ॅपमध्ये भेटू शकता. याची निर्मिती फेसबुकनं केली आहे.

हॅप्पन आणि टिंडरमध्ये जास्त फरक नाही. इथे देखील तुम्हाला फेसबुकनं लॉगिन करण्याचा पर्याय मिळतो. परंतु तुमच्या फेसबुकवरील माहिती हॅप्पनवर दिसत नाही. फक्त नाव आणि वय दिसतं.

बम्बल जगातील दुसऱ्या क्रमांकाचं डेटिंग अ‍ॅप आहे. याची खासियत म्हणजे इथे फक्त मुली मुलांशी पहिला कॉन्टॅक्ट करू शकतात. फक्त डेटिंग नव्हे तर मित्र आणि बिजनेस कनेक्शन्ससाठी देखील या अ‍ॅपचा वापर करता येतो.

हिंज एक स्मार्टफोन डेटिंग अ‍ॅप आहे. इथे रिलेशनशिपवर दिला जातो त्यामुळे फक्त तुमच्या फेसबुक लिस्टमधील मित्रांचे मित्र किंवा मैत्रिणी या अ‍ॅपवर असल्यास तुम्हाला दिसतील.

ओके क्युपिडचा वापर करून तुम्ही तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या सिंगल लोकांशी कनेक्ट करू शकता. इथे तुम्हाला पर्सनलाइज्ड कम्पॅटिबिलिटी पर्संटेज मिळते, ज्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात.