iPhone युजर्ससाठी महत्वाची बातमी! Apple दोन जुन्या मॉडेल्सवर देतेय मोफत सर्विस; जाणून घ्या कारण  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 01:22 PM2021-11-24T13:22:57+5:302021-11-24T13:23:47+5:30

Apple iPhone 12 And 12 Pro Sound Problem: Apple ने iPhone 12 and iPhone 12 Pro च्या मोफत आणि रिपेयरची घोषणा केली आहे. ज्या युजरकडे असे डिफेक्टिव्ह युनिट्स असतील ते अ‍ॅप्पल स्टोरवर जाऊन मोफत रिपेयरिंग करवून घेऊ शकतात.  

Apple giving free service and Repair on iPhone 12 and 12 Pro model  | iPhone युजर्ससाठी महत्वाची बातमी! Apple दोन जुन्या मॉडेल्सवर देतेय मोफत सर्विस; जाणून घ्या कारण  

iPhone युजर्ससाठी महत्वाची बातमी! Apple दोन जुन्या मॉडेल्सवर देतेय मोफत सर्विस; जाणून घ्या कारण  

Next

Apple कंपनी आपली ब्रँड व्हॅल्यू जपण्याचं काम नेहमीची करते. कंपनी दर्जेदार प्रोडक्ट सादर करते आणि युजर्सच्या प्रायव्हसी व सिक्योरिटीची काळजी घेतली जाते. त्यामुळेच Apple ने आता iPhone 12 and iPhone 12 Pro च्या मोफत आणि रिपेयरची घोषणा केली आहे. परंतु यामागचं कारण देखील तसंच आहे ते आपण पुढे जाणून घेऊया.  

अ‍ॅप्पल आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रो युजर्सना कंपनीकडून मोफत सर्विस आणि रिपेयरची सुविधा मिळणार आहे. कारण या फोन्सच्या काही युनिट्सच्या स्पीकर आणि साउंड सिस्टममध्ये दोष आढळला आहे, असं कंपनीनं सांगितलं आहे. ज्या युजरकडे असे डिफेक्टिव्ह युनिट्स असतील ते अ‍ॅप्पल स्टोरवर जाऊन मोफत रिपेयरिंग करवून घेऊ शकतात.  

आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रो चे मॉडेल्स ऑक्टोबर 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान निर्माण झाले आहेत. या कालावधीत बाजारात आलेल्या सर्व युनिट्समध्ये हा दोष आढळला नाही, असं कंपनीनं सांगितलं आहे. परंतु यातील काही निवडक शिपमेंटमध्ये ही समस्या आढळली आहे. भारतात देखील iPhone 12 आणि iPhone 12 Pro युजर्स या सुविधेचा वापर करू शकतात. तुमच्याकडे हे फोन्स असतील आणि त्यांच्या साउंड सिस्टममध्ये प्रॉब्लम असेल तर वॉरंटी संपल्यावर देखील मोफत रिपेयर करवून घेता येतील. सर्विस सेंटरवर फोन घेऊ जाण्याआधी तुमच्या संपूर्ण डेटाचा बॅकअप घेण्याचा कंपनीनं दिला आहे.  

Web Title: Apple giving free service and Repair on iPhone 12 and 12 Pro model 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.