2020 मध्ये येणार 5G iPhone, अॅपलचे नसणार मॉडेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 18:14 IST2018-11-05T18:13:35+5:302018-11-05T18:14:39+5:30
स्मार्टफोन कंपन्या आता 5 जी स्मार्टफोन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहेत. काही कंपन्या 5 जी स्मार्टफोन्सचे टेस्टिंग सुद्धा करत आहेत. आगामी वर्षात मार्केटमध्ये 5 जी स्मार्टफोन्स पाहायला मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

2020 मध्ये येणार 5G iPhone, अॅपलचे नसणार मॉडेम
नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपन्या आता 5 जी स्मार्टफोन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहेत. काही कंपन्या 5 जी स्मार्टफोन्सचे टेस्टिंग सुद्धा करत आहेत. आगामी वर्षात मार्केटमध्ये 5 जी स्मार्टफोन्स पाहायला मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, अॅपल कंपनी सध्या 5 जी स्मार्टफोन्सचा विचार करत नाही आहे. एका रिपोर्टनुसार, अॅपल कंपनी 2020 मध्ये 5 जी सपोर्ट असलेले आयफोन लाँच करणार असल्याचे समजते.
रिपोर्टनुसार, अॅपल कंपनी 2020 मध्ये 5 जी आयफोनसाठी इंटेल 8161 चिपसेटचा वापर करणार आहे. याचे काम सुरु आहे. सर्वकाही व्यवस्थित सुरु राहिल्यास आयफोन मॉडेमसाठी इंटेल निवडले जाणार आहे. दरम्यान, इंटेल 8160 नावाने चिपसेटवर काम सुरु आहे. त्याचा वापर प्रोटोटाइप आणि टेस्टिंगसाठी केला जाणार आहे.
फास्ट कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅपलने 5 जी मॉडेमसाठी मीडियाटेकसोबत चर्चा केली आहे. मात्र प्लॅन बी सांगण्यात येत आहे. मीडियाटेक सुद्धा 5 जी मॉडेमवर काम करत आहे. मात्र, सर्रास ही कंपनी बजट स्मार्टफोन्ससाठी प्रोसेसरची निर्मिती करते. अॅपल आणि क्वॉल्कॉम यांच्यात कायदेशीर लढाई सुरु आहे.त्यामुळे क्वॉल्कॉमसोबत 5 जी चिपसेट विषयी कोणतीही चर्चा होईल असे वाटतं नाही. दरम्यान, अॅपल कंपनीने या रिपोर्टवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.