App Review: झोप येत नाही? ‘या’ अ‍ॅपवरील मोफत गोष्टींमुळे येईल काही मिनिटांत ‘नींद’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 05:55 PM2022-06-01T17:55:19+5:302022-06-01T17:55:45+5:30

मराठीसह नींद अ‍ॅपवर हिंदी, तमीळ आणि तेलगु भाषेतील कथा तसेच मेडिटेशन, मनाला शांत करणारे संगीत देखील अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे.

App Review Free stories on Neend app will make you sleepy in minutes | App Review: झोप येत नाही? ‘या’ अ‍ॅपवरील मोफत गोष्टींमुळे येईल काही मिनिटांत ‘नींद’ 

App Review: झोप येत नाही? ‘या’ अ‍ॅपवरील मोफत गोष्टींमुळे येईल काही मिनिटांत ‘नींद’ 

googlenewsNext

रात्री झोप येत नाही. खूप उपाय केले पण झोप लागत नाही अशा अनेक तक्रारी आपण ऐकतो. प्रत्येकाला शांत झोप हवीय. यासाठी अनेक अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत. यातील ‘नींद अ‍ॅप’ आम्ही ट्राय केलं. यात मराठीत अनेक गोष्टी आहेत ज्या ऐकून शांत झोप येते. गोष्ट पूर्ण होण्याआधीच साधारण पंधरा ते वीस मिनीटांनंतर तुम्हाला शांत झोप येवू लागते असा नींद अ‍ॅपचा दावा आहे.  

मराठीसह नींद अ‍ॅपवर हिंदी, तमीळ आणि तेलगु भाषेतील कथा तसेच मेडिटेशन, मनाला शांत करणारे संगीत देखील अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा हे सर्वकाही विनामुल्य आहे. विशेष म्हणजे अ‍ॅपमध्ये निळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे जो आपल्याला शांतता देतो. गोष्ट ऐकताना तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी छोटे छोटे व्यायाम देखील करायला सांगितले जातात. सध्यातरी कोणत्याही जाहिरातीची कटकट नाही यात नाही.  

नींद अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर किती मिनीटांची कथा ऐकायची आहे त्याचा टायमर आपण सेट करू शकतो. समजा कथा ऐकताना तुम्हाला वीस मिनीटात झोप येते तर तसा टाईमर सेट करू शकता. वीस मिनिटांनी कथा आपोआप बंद होते आणि तुमचा फोन तुम्ही ज्या मोडवर ठेवता तसा राहतो. इथे पौराणिक,नॉस्टॅलॅजिक किंवा ऐतिहासिक अशा अनेक प्रकारच्या कथा आहेत.  

नींद अ‍ॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करु शकता. तसेच स्पॉटीफाय, सावन, गाना डॉट कॉम, युट्युब यावर देखील नींद अ‍ॅपच्या कथा उपलब्ध आहेत. मला मराठीतील नल दमयंती आख्यान आवडलं. युआयमध्ये अजून अनेक सुधारणा करता येतील. तसेच प्रत्येक गोष्ट ऐकताना वेगळा स्लिप टायमर ठेवण्याची सोय देखील या अ‍ॅपमध्ये असायला हवी होती. मराठीमध्ये मेडिटिएशन सेक्शन अजून सुरु झालं नाही. या काही त्रुटी जरी असल्या तरी शांत झोप देण्याचा दावा फोल ठरत नाही. तेव्हा शांत हवी असेल तर तुम्ही नींद अ‍ॅप ट्राय करू शकता.  

 

Web Title: App Review Free stories on Neend app will make you sleepy in minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.