शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आनंद महिंद्रांचा WhatsApp ला रामराम; सिग्नल अॅप केले डाऊनलोड; नेटकऱ्यांच्या कानपिचक्या

By देवेश फडके | Published: January 12, 2021 12:42 PM

नवीन पॉलिसीच्या विरोधात कोट्यवधी युझर्सनी व्हॉट्सअॅपला रामराम केला आहे. अनेक दिग्गज मंडळींनंतर आता आनंद महिंद्रा यांनीही व्हॉट्सअॅप सोडून सिग्नल अॅपची वाट धरली आहे. 

ठळक मुद्देआनंद महिंद्रा यांनी केले सिग्नल अॅप डाऊनलोडनवीन पॉलिसीला विरोध म्हणून व्हॉट्सअॅला केला रामरामआनंद महिंद्रा यांच्या कृतीवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

नवी दिल्ली : मेसेजिंगसाठी जगप्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सअॅपने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत युझर्सची नाराजी दिवसेंदिवस आणखीनच वाढत चाललेली पाहायला मिळत आहे. नवीन पॉलिसीच्या विरोधात कोट्यवधी युझर्सनी व्हॉट्सअॅपला रामराम केला आहे. याचा फायदा सिग्नला अॅपला मोठ्या प्रमाणावर झाला आहे. अनेक दिग्गज मंडळींनंतर आता आनंद महिंद्रा यांनीही व्हॉट्सअॅप सोडून सिग्नल अॅपची वाट धरली आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे. ''आता मी सिग्नल अॅप डाऊनलोड केले आहे. लवकरच तेथे भेटू'', असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. यानंतर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया यावर आल्या असून, काही जणांनी आनंद महिंद्रा यांची फिरकी घेतली आहे, तर काही जणांनी आनंद महिंद्रा यांच्या कृतीला समर्थन दिले आहे. 

प्रायव्हसीबाबत चिंता वाटत असेल तर सोशल मीडियाचा वापरच करू नका, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर, अनेक नेटकऱ्यांनी सिग्नल अ‍ॅपचे समर्थन करत महिंद्रांनी उचललेले पाऊल योग्य असल्याचे म्हटल आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी तुम्ही डाउनलोड केलेले अ‍ॅप आम्हीही निश्चिंतपणे डाउनलोड करू शकतो, असे म्हटले आहे. 

दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनीही काही दिवसांपूर्वी ट्विटरवर सिग्नल अ‍ॅप वापरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर भारतातील पेटीएम कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनीही भारतीयांना सिग्नल अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहन केले. एवढेच नव्हे तर जागतिक स्तरावरील अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांनीही व्हॉट्सअॅप सोडून अन्य पर्याय स्वीकारले आहेत. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपAnand Mahindraआनंद महिंद्राSocial Mediaसोशल मीडिया