Samsung Galaxy S24: थेट अर्ध्या किंमतीत खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी एस २४; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:35 IST2026-03-25T15:32:35+5:302026-03-25T15:35:54+5:30
Samsung Galaxy S24 Price Drop: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ खूप कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

Samsung Galaxy S24: थेट अर्ध्या किंमतीत खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी एस २४; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ खूप कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. हा फ्लॅगशिप सॅमसंगफोन त्याच्या लॉन्च किमतीच्या जवळपास निम्म्या किमतीत उपलब्ध आहे. २०२४ मध्ये लॉन्च झालेल्या या फोनची किंमत ₹३५००० पर्यंत कमी करण्यात आली. हा सॅमसंग फोन ई-कॉमर्स वेबसाइट ॲमेझॉनवर मोठ्या सवलती आणि बँक ऑफर्ससह उपलब्ध आहे.
हा सॅमसंग फोन ७४ हजार ९९९ रुपये सुरुवातीच्या किमतीत लॉन्च झाला होता. परंतु, आता हा फोन ४३ हजार ९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. या फोनच्या खरेदीवर ॲमेझॉन १ हजार ५०० ची बँक सवलत देत आहेत. त्यामुळे हा फोन ४१ हजार ४९९ च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होईल.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४: डिस्प्ले आणि स्टोरेज
हा सॅमसंग फोन ६.२ इंचाच्या 2x डायनॅमिक आयलँड डिस्प्लेसह येतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये पंच-होल डिझाइन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 प्रोसेसरवर चालतो. यात ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज आहे.
हे देखील वाचा: टेक्नोचा धमाका! बजेट ग्राहकांसाठी अवघ्या ८४९९ रुपयांत लॉन्च केला तगडा स्मार्टफोन
सॅमसंग गॅलेक्सी एस २४: कॅमेरा
या फोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्लेसचा मुख्य OIS कॅमेरा, त्यानंतर १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड आणि ५ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, या फोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
हे देखील वाचा: थेट आयफोनला टक्कर? शाओमीचा सर्वात दमदार फ्लॅगशिप फोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
सॅमसंग गॅलेक्सी एस २४: बॅटरी आणि सेक्युरिटी अपडेट्स
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ मध्ये ४००० mAh बॅटरी असून हा फोन २५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित OneUI ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. कंपनी या फोनसाठी सहा वर्षांपर्यंत सेक्युरिटी अपडेट्स देते.