Alert! Anyone can suspend your WhatsApp account; There was a big mistake | Alert ! कोणीही करू शकतं तुमचं WhatsApp अकाऊंट सस्पेंड; समोर आली मोठी त्रुटी

Alert ! कोणीही करू शकतं तुमचं WhatsApp अकाऊंट सस्पेंड; समोर आली मोठी त्रुटी

ठळक मुद्देकोणतीही व्यक्ती तुमचं WhatsApp अकाऊंट करू शकतं सस्पेंडपुन्हा एकदा नवी त्रुटी आली समोर

इन्स्टंट मेसेजिंग WhatsApp मध्ये एक मोठी त्रुटी आढळली आहे. ज्याद्वारे कोणीही वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय वापरकर्त्याचं WhatsApp खातं निलंबित करू शकत. यासाठी, हॅकर्सना वापरकर्त्याच्या फोन नंबरची आवश्यकता असेल. लुफोल सिक्युरिटी रिसर्चर्स लुइस मर्केज कार्पेन्थो आणि अर्नेस्टो कॅनालिस पेरेना यांनी याबाबत शोध लावला.

कोणताही हॅकर केवळ वापरकर्त्याचे WhatsApp खाते निलंबित करू शकतो. तो त्या व्यक्तीच्या खात्यात प्रवेश करू शकत नाही किंवा खासगी चॅट आणि संपर्क उघड करू शकत नाही. यासाठी हॅकर्स आपल्या डिव्हाईसमध्ये WhatsApp डाऊनलोड करतात. त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या फोन क्रमांकासह लॉग इन करण्याचा प्रयत्नही करतात. परंतु जर एखाद्या युझरनं टू स्टेप व्हेरिफिकेशन ठेवलं असेल तर त्या व्यक्तीकडे कॉल येईल. अशा हॅकर्सला काही करता येणार नाही. 

WhatsApp काही ठराविक मर्यादेपर्यंतच युझर्सना हा कोड पाठवतो. जर अनेकदा चुकीचा कोड टाकला तर १२ तासांसाठी अकाऊंट लॉक होतो. याचाच अर्थ हॅकर आणि युझर दोघंही अकाऊंट वापरू शकणार नाहीत. या प्रोसेसचा दुसरा भागही आहे. हॅकर एक नवा ईमेल तयार करतो आणि support@whatsapp.com वर नंबर डिअॅक्टिव्हेट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवतो. यामध्ये फोन चोरी होण्याचं कारण देण्यात येतं.

Forbes च्या एका रिपोर्टनुसार हे स्पष्टपणे सांगण्यात आलंय की WhatsApp कडे एक ईमेल पाठवण्यात आला आहे त्यात काही मोबाईल क्रमांक आहेत. दरम्यान हे युझर आहे की हॅकर हे जाणून घेण्याचा त्यांच्याकडे पर्याय नाही. युझरच्या बाबतीत जाणण्यासाठी कंपनीकडून कोणतंही फॉलोअप घेतलं जात नाही. तसंच या परिस्थितीत ऑटोमेटेड प्रोसेस ट्रिगर होते आणि युझरचा अकाऊंट डिअॅक्टिव्हेट होतो. त्यानंतर तासाभरानं युझरला त्याचा अकाऊंट बंद केल्याचा मेसेज मिळतो. अशा परिस्थितीत WhatsApp ची टू स्टेप व्हेरिफिकेशन तुम्हाला यापासून बऱ्यापैकी वाचवू शकते. परंतु यासाठी WhatsApp नं काही पावलं उचलण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Web Title: Alert! Anyone can suspend your WhatsApp account; There was a big mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.