फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 20:18 IST2025-07-16T20:17:32+5:302025-07-16T20:18:41+5:30

Al+ Nova 5G and Al+ Pulse 5G: सर्वात स्वस्त एआय फोनला भारतीय बाजारपेठेत खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

Al+ Nova 5G and Al+ Pulse 5G Price and Specifications | फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!

फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!

भारतातील सर्वात स्वस्त एआय + नोव्हा 5G आणि एआय + पल्स 5G फोनचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या सेलमध्ये हा फोन सोल्ड आउट झाला आहे. या स्मार्टफोनचा पुढील सेल उद्या १७ जुलै २०२५ रोजी लाइव्ह होईल.  या फोनमध्ये ५० मेगापिक्सेल कॅमेरा, ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी आणि मोठा डिस्प्ले आहे.

एआय + नोव्हा 5G आणि एआय + पल्स 5G दोन व्हेरिएंटसह लॉन्च करण्यात आले. भारतात एआय + पल्सच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. तर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. एआय + नोव्हा 5G च्या ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला फोन ९ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे.

एआय+ नोव्हा 5G आणि एआय+ पल्स 5G स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये १ टीबीपर्यंत एक्सपांडेबल स्टोरेज मिळत आहे. हे फोन भारतात विकसित केलेल्या NxtQuantum OS वर चालतात. शिवाय, दोन्ही फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, GPS, 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB टाइप-सी पोर्ट सारखी आवश्यक वैशिष्ट्ये आहेत. यात ५० मेगापिक्सेल एआय- चालित ड्युअल रिअर कॅमेरा मिळतो आणि सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी आहे, जी १९ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Al+ Nova 5G and Al+ Pulse 5G Price and Specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.