शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

Airtel Plan : एअरटेलच्या 'या' प्रीपेड प्लॅनवर मिळणार 2 लाखांचा विमा आणि बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 10:30 IST

Airtel Plan : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या विविध प्लॅन्स आणि ऑफर्स आणत असतात.

ठळक मुद्देएअरटेलने ग्राहकांसाठी 179 रुपयांचा एक नवा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे. ग्राहकांना प्लॅनमध्ये फ्री एसएमएस, डेटा आणि कॉलिंगसह भारती एएक्सएच्यावतीने जीवन विमा दिला जात आहे.179 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना 2 लाखांचे विमाकवच मिळणार आहे.

नवी दिल्ली - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या विविध प्लॅन्स आणि ऑफर्स आणत असतात. एअरटेलने ही आपल्या ग्राहकांसाठी 179 रुपयांचा एक नवा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे. ग्राहकांना या प्लॅनमध्ये फ्री एसएमएस, डेटा आणि कॉलिंगसह भारती एएक्सएच्यावतीने जीवन विमा दिला जात आहे. 179 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना 2 लाखांचे विमाकवच मिळणार आहे. याआधीही एअरटेलने अनेक प्लॅन्स आणले होते. यामध्ये प्रीपेड ग्राहकांसाठी 4 लाखांचे विमाकवच प्रदान करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. 

एअरटेलने रविवारपासून (19 जानेवारी) 179 रुपयांचा नवा प्लॅन सुरू केला आहे. या प्लॅनचे ग्राहकांना अनेक फायदे आहेत. Bharti AXA कडून ग्राहकांना या नव्या प्लॅनमध्ये 2 लाख रुपयांचा जीवन विमा मिळणार आहे. 28 दिवसांसाठी असलेल्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग करता येणार आहे. तसेच ग्राहकांना 2 जीबी डेटा आणि 300 फ्री एसएमएस दिले जाणार आहेत. प्लॅनमध्ये एअरटेल एक्सट्रीम अ‍ॅप आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे.

एअरटेलच्या या नव्या प्लॅनमधील 2 लाखांचा जीवन विमा हा 18 ते 54 वर्षे वयोगटातील व्यक्तींना मिळणार आहे. यासाठी कोणतीही कागदपत्रे आणि वैद्यकीय चाचणीची गरज नाही. रिचार्ज केल्यानंतचर लगेचच विमा पॉलिसी मिळणार आहे. ग्राहकांना पॉलिसीची कॉपी हवी असेल तर विनंती केल्यावर ती उपलब्ध होईल. एअरटेल  रिटेल स्टोर अथवा अ‍ॅपच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत ही प्रक्रिया करता येणार आहे. तसेच एअरटेल 279 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर ग्राहकांना 4 लाखांचा विमा मिळत आहे. यामध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस फ्री मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग देण्यात आलं आहे. 

जिओकडून कडवी टक्कर मिळत असल्याने काही दिवसांपूर्वीही भारती एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी ऑफर आणली होती. प्रीपेड ग्राहकांसाठी 4 लाखांचे विमाकवच प्रदान करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. भारती एएक्सएसोबत करार करण्यात आला आहे. भारतात विमा घेणाऱ्यांची संख्या केवळ 4 टक्के आहे, तर मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या ही खूपच मोठी आहे. यामुळे एअरटेलच्या ग्राहकांना विमा पुरविण्यात येणार असल्याचे एअरटेलने सांगितले. 

एअरटेलने 599 रुपयांच्या रिचार्जवर 84 दिवसांची व्हॅलिडीटी दिली आहे. तसेच हे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकाला दिवसाला 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनसोबत एअरटेलने ग्राहकांना 4 लाखांचा विमा पुरविला आहे. 2022 मध्ये भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या 83 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. हा विमा 18 ते 54 वयोगटातील ग्राहकांसाठी लागू होणार आहे. हा विमा लागू करण्यासाठी रिचार्ज केल्यानंतर एसएमएस, एअरटेल अ‍ॅप किंवा गॅलरीमध्ये रजिस्टर करावे लागणार आहे.हा विमा 84 दिवसांसाठी लागू राहणार असून विम्याची कॉपी ग्राहक घरीही मागवू शकणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद : शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे; आज मुख्यमंत्री तोडगा काढणार

साईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा

3500 किलोमीटर दूरवर हवेतच नेस्तनाबूत होणार शत्रूचं विमान, K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी

छत्रपती शिवरायांनाही जिंकता आला नव्हता असा 'हा' अजिंक्य किल्ला; काय आहे यामागचं रहस्य?

'या' बातम्याही नक्की वाचा

Instagram टिकटॉकला टक्कर देणार, बुमरँगमध्ये नवीन फीचर्स मिळणार

Whatsapp Web वरचे 'हे' खास फीचर्स माहीत आहेत का?

आता स्मार्टफोनला करा टीव्हीचा रिमोट; कसं ते जाणून घ्या

जगातील सर्वात छोटा 3G स्मार्टफोन लाँच; वजन फक्त 31 ग्रॅम, जाणून घ्या खासियत

Google Maps पार्किंग स्पेस शोधण्यास मदत करणार; फॉलो करा सोप्या स्टेप्स... 

 

टॅग्स :AirtelएअरटेलInternetइंटरनेट