Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:02 IST2025-08-18T18:00:17+5:302025-08-18T18:02:21+5:30
Airtel Down: मुंबई-दिल्लीसह देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये Airtelची सेवा ठप्प झाली आहे.

Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
Airtel Down: देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Airtel ची सेवा बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. एअरटेलच्या कोट्यवधी मोबाईल युजर्सना मागील काही तासांपासून कॉल करण्यात आणि इंटरनेट वापरण्यात अडचणी येत आहेत. अनेक युजर्सनी सोशल मीडियावर एअरटेलची सेवा बंद पडल्याची माहिती केली. स्वतः एअरटेलनेही सोशल मीडियावर पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली असून, शक्य तितक्या लवकर सेवा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे म्हटले.
BSNL च्या प्लॅनवर मिळतोय 6000 रुपयांचा बंपर डिस्काउंट; 'या' तारखेपर्यंत घ्या फायदा...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरटेल युजर्सना दुपारी ४ वाजल्यापासून कनेक्टिव्हिटीच्या समस्या येत होत्या. एअरटेलच्या मोबाइल सेवेबाबत २,३०० हून अधिक युजर्सनी ही तक्रार नोंदवली. दिल्ली-एनसीआर, जयपूर, कानपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता येथील एअरटेल ग्राहकांना सध्या नेटवर्क आणि इंटरनेट समस्यांचा सामना करावा लागत आहे.
कंपनीने मागितली माफी
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले की, 'आम्हाला सध्या नेटवर्क आउटेजचा सामना करावा लागत आहे. हे दुरुस्त करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत. यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही आमच्या युजर्सची माफी मागतो.' अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एअरटेलच्या सेवेत समस्या असल्याचे म्हटले. मात्र, एअरटेलच्या ब्रॉडबँड सेवेवर परिणाम झालेला नाही. एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर