Airtel annoyed by Jio's misscall 'trick'; Reliance Jio of gaming the system by reducing call ring time | जिओच्या मिसकॉल 'ट्रिक'मुळे एअरटेल हैराण; आरोप प्रत्यारोपाला सुरूवात

जिओच्या मिसकॉल 'ट्रिक'मुळे एअरटेल हैराण; आरोप प्रत्यारोपाला सुरूवात

देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कोल्ड वॉर सुरू झाले आहे. यामुळे एअरटेल आणि रिलायन्स जिओ पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. एअरटेलनेजिओवर दुसऱ्या नेटवर्कच्या वापरासाठीच्या शुल्कासोबत खेळ मांडल्याचा आरोप केला आहे. 


कंपन्यांमध्ये एक करार केलेला असतो. त्यानुसार कॉल करण्यासाठी जर दुसऱ्या नेटवर्कचा वापर केला गेला असेल तर त्याला मिनिटाला ठराविक रक्कम द्यावी लागते. याला इंटरकनेक्ट युसेज चार्ज असे म्हणतात. जिओने यामध्येच छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. 


एअरटेल कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जिओचे नाव न घेता सांगितले की, एक मोठी 4जी कंपनीने मनमानी करत दुसऱ्या नेटवर्कवर केल्या जाण्याऱ्या आऊटगोईंग काँलची रिंग वाजण्याची वेळ कमी केली आहे. यामुळे हा कॉल मिसकॉलमध्ये गणला जातो. मिसकॉल आलेल्या ग्राहकांना त्या नंबरवर पुन्हा कॉल करावा लागत आहे. 


यावर जिओने या आरोपांवर सांगितले की, आम्ही व्होडाफोनसारख्या जागतिक कंपन्या वापरत असलेल्या प्रक्रियेनुसार आऊटगोईंग कॉलची रिंग 20 सेकंद केलेली आहे. कंपनीच्या नेटवर्कवर येणारे बहुतांश कॉल हे मिसकॉल असतात. हे प्रमाण एक चतुर्थांश आहे. जिओवरून कॉल मोफत असल्याने अन्य कंपन्यांचे ग्राहक ही क्लुप्ती वापरतात. कारण या कंपन्या त्यांच्याकडून पैसे वसूल करतात. यामुळे जास्तीत जास्त ग्राहक कॉल करण्य़ासाठी जिओला प्राधान्य देतात.
 

Web Title: Airtel annoyed by Jio's misscall 'trick'; Reliance Jio of gaming the system by reducing call ring time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.