मोबाईल युझर्सना बसणार फटका! ...तर फोनवर बोलण्यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 05:42 PM2020-09-02T17:42:51+5:302020-09-02T17:49:54+5:30

सर्वोच्च न्यायालयाने टेलिकॉम ऑपरेटर्सना मंगळवारी 31 मार्च 2021पर्यंत अजस्ट करण्यात आलेल्या ग्रॉस रेव्हेन्यूच्या 10 टक्के रक्कम जमा करण्याचा आदेश दिला आहे. याच बरोबर, उर्वरित रक्कम 31 मार्च 2022पर्यंत 10 हप्त्यांत भरावी, असा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Airtel and Vodafone have to pay 10 percent of the adjusted gross revenue by march 2021 telecom services may get costlier | मोबाईल युझर्सना बसणार फटका! ...तर फोनवर बोलण्यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

मोबाईल युझर्सना बसणार फटका! ...तर फोनवर बोलण्यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

Next

नवी दिल्ली - मोबाईल युझर्ससाठी टेलिकॉम सेवा किमान 10 टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता आहे. इंडस्ट्रीच्या अंदाजानुसार, पुढील 7 महिन्यांत एअरटेल आणि व्होडाफोनला अजस्ट करण्यात आलेल्या ग्रॉस रेव्हेन्यूच्या 10 टक्के रकमेचा भरणा करावा लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने टेलिकॉम ऑपरेटर्सना मंगळवारी 31 मार्च 2021पर्यंत अजस्ट करण्यात आलेल्या ग्रॉस रेव्हेन्यूच्या 10 टक्के रक्कम जमा करण्याचा आदेश दिला आहे. याच बरोबर, उर्वरित रक्कम 31 मार्च 2022पर्यंत 10 हप्त्यांत भरावी, असा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

मार्च 2021पर्यंत द्यावे लागणार 5000 कोटी रुपये
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मार्च 2021पर्यंत एअरटेलला 2600 कोटी तर व्होडाफोन-आयडियाला 5000 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. अशातच ब्रोकरेज फर्म Jefferiesच्या मते, एअरटेल आपला अॅव्हरेज रेव्हेन्यू प्रति युझर 10 टक्के आणि व्होडाफोन 27 टक्क्यांपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. चालू आर्थीक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचा प्रति युझर रेव्हेन्यू प्रत्येकी 157 आणि 114 रुपये एवढा होता. आगामी काळात टेलिकॉम कंपन्या पुन्हा 10 टक्क्यांनी टेरिफ महाग करण्याची शक्यता आहे.

पुढील तिमाहित टेरीफ महागण्याची शक्यता -
उद्योजक आणि टीएमटीचे सल्लागार संजय कपूर यांनी म्हटले आहे, की सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निर्णयाचा  टेलिकॉम कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या भाव वाढीशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही. मात्र भविष्यात असे करावे लागणार आहे. कारण स्पेक्ट्रमचा खर्च आणि इतर गुंतवणूक हे दोन्हीही वेगळे केले, तरी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना डेटा युसेजची ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरासरी तीन ते चार डॉलर प्रति युझर रिव्हेन्यूची गरज पडणार आहे. यामुळे पुढील तिमाहीपर्यंत टेरिफ रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

सरासरी 200 रुपये प्रति युझर रेव्हेन्यूची आवश्यकता -
टेलिकॉम कंपन्यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आपले प्लॅन्स 40 टक्क्यांनी वाढवले होते. असा निर्णय कंपन्यांनी गत चार वर्षांत पहिल्यांदाच घेतला होता. यानंतर 2020च्या पहिल्या सहामाहित कंपन्यांची कमाई 20 टक्क्यांनी वाढली होती. तसेच, 'पुढील 12 ते 24 महिन्यांत टेलिकॉम कंपन्यांना प्रति युझर सरासरी 200 रुपये रेव्हेन्यूची आवश्यकता भासेल, असे Analysys Masonचे भारत आणि मध्यआशियाचे प्रमुख रोहम धमीजा यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या; पत्नी आणि मुलगीही जखमी

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती

Web Title: Airtel and Vodafone have to pay 10 percent of the adjusted gross revenue by march 2021 telecom services may get costlier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.