माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 02:42 IST2025-11-27T02:41:15+5:302025-11-27T02:42:12+5:30
खरे तर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने माणसाचे आयुष्य वाढवता येईल, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
माणसाचे सरासरी आयुष्य सुमारे ७२ वर्षेंपर्यंत असल्याचे बोलले जाते. फारच कमी लोक १०० वर्षांपर्यंतही जगू शकतात. मात्र आता, भविष्यात माणूस १५० वर्षांपर्यंत निरोगी आणि ठणठणीत आयुष्य जगू शकेल, असा दावा केला जात आहे. खरे तर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने माणसाचे आयुष्य वाढवता येईल, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
खरे तर, आपल्या शरीरातील पेशींमधील डीएनए (DNA) खराब झाल्याने शरीर वृद्ध होते, असे डेटा सोसायटीच्या अहवालातून समोर आले आहे. खाणे-पिणे आणि अधिक आराम, यामुळे शरीर दुरुस्ती ऐवजी नवीन पेशी बनवत राहते. मात्र, हार्वर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एक नवीन पद्धत शोधली आहे, ज्यामध्ये शरीराला 'झटका' (Shock) दिला जातो, ज्यामुळे पेशी स्वतःहून दुरुस्ती करण्यास सुरुवात करतात. यावर आधारित औषध सध्या चाचणी स्तरावर आहे.
AI देणार 'वैयक्तिक' उपचार: या प्रक्रियेत AI ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. CRISPR सारख्या जुन्या तंत्रज्ञानाने डीएनए एका क्षणाची स्थिती दर्शवायचा. परंतु, अन्न, तणाव आणि हवामानानुसार जनुकांचे (Gene) वर्तन सतत बदलते. AI याच जनुकांच्या हालचालींवर पूर्णवेळ नजर ठेवते आणि नेमक्या योग्य वेळी 'व्यक्ती-विशिष्ट' उपचार सुचवते. यामुळे उपचार अत्यंत अचूक होतात आणि दुष्परिणाम कमी होतात.
शास्त्रज्ञांच्या अथवा वैज्ञानिकांच्या मते, भविष्यात ६०-७० वर्षांचे लोकही २०-२५ वर्षांच्या लोकांसारखे तीक्ष्ण बुद्धीचे राहतील. यासंदर्भात बोलताना डेटा सोसायटीचे सह-संस्थापक दिमित्री ॲडलर म्हणतात, "AI तुम्हाला सुपरहिरो बनवणार नाही, पण अधिक निरोगी, तल्लख आणि मजबूत करेल." लवकरच आपण १००-१२० वर्षांचे असूनही तरुण आणि उत्साही असलेले लोक पाहू शकू.