'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 10:27 IST2025-10-27T10:27:06+5:302025-10-27T10:27:56+5:30

AI Technology Fail: अमेरिकेतील मेरिलँडमध्ये AI सुरक्षा प्रणालीची मोठी चूक. चिप्सचे पाकीट बंदूक समजून एका शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तंत्रज्ञानाच्या मर्यादांमुळे झालेल्या या घटनेमुळे प्रशासनाने माफी मागितली.

AI Technology Fail: AI's big mistake! Chips packet mistaken for gun; School student handcuffed by security officers... | 'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...

'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...

बाल्टिमोर: आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स  तंत्रज्ञानाची मर्यादा दाखवणारी आणि तितकीच धक्कादायक घटना अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील बाल्टिमोर काउंटी येथे घडली आहे. येथील एका हायस्कूलमध्ये लावलेल्या एआय-आधारित सुरक्षा प्रणालीने एका शाळकरी विद्यार्थ्याच्या हातात असलेल्या चिप्सच्या पाकिटाला चक्क बंदूक समजले आणि पोलिसांना कळविले. यापुढे कहर म्हणजे कशाचीही शहानिशा न करता पोलिसांनी या विद्यार्थ्याला इतर मुलांसमोर बेड्या ठोकून घेऊन गेले. अखेर एआयची चूक असल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाला माफी मागावी लागली आहे.  

'द गार्डियन'ने दिलेल्या माहितीनुसार, टाकी एलन नावाचा हा विद्यार्थी सोमवारी रात्री केनवुड हायस्कूलच्या बाहेर आपल्या मित्रांसोबत नाश्ता करण्यासाठी जात होता. यावेळी शाळेतील एआय-आधारित सुरक्षा प्रणालीने एलनच्या हातात असलेली वस्तू 'धोका' म्हणून ओळखली आणि तत्काळ सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क केले.

एआयचा अलर्ट मिळताच, अनेक सुरक्षा कर्मचारी तिथे दाखल झाले. त्यांनी कोणतीही शहानिशा न करता, बंदुका रोखून एलनला जमिनीवर झोपायला लावले. घाबरलेल्या एलनने डब्ल्यूबीएएल-टीव्ही ११ न्यूजला सांगितले की, "ते माझ्याकडे बंदूक घेऊन येत आहेत हे कळलेच नाही, आणि 'जमिनीवर झोप' असे सांगताच मी गोंधळलो."

चिप्सचे पाकीट ठरले 'बंदूक'!
पोलिसांनी एलनच्या हातात हातकडी घालून त्याची कसून तपासणी केली. पण त्याच्याजवळ आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही. नंतर फुटेजची सखोल तपासणी केली असता, धक्कादायक सत्य समोर आले. एलनने हातात पकडलेले 'डोरीटोस' चिप्सचे पाकीट बाजूला वळल्यामुळे त्याचा काही भाग बंदुकीसारखा दिसत होता, ज्याला एआय प्रणालीने गंभीर धोका समजून चुकीचा अलर्ट दिला होता.

या प्रकारानंतर, सुरक्षा अधिकाऱ्यांनी एलनला सोडून दिले. एआय प्रणालीच्या या गंभीर चुकीमुळे विद्यार्थ्याला झालेल्या मनस्तापाबद्दल शालेय प्रशासनाने नंतर एलन आणि त्याच्या मित्रांची माफी मागितली आहे. ही घटना, अति-विकसित तंत्रज्ञानावरील अवलंबित्व आणि मानवी निरीक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते.

Web Title : एआई की बड़ी भूल: चिप्स को समझा बंदूक, छात्र गिरफ्तार।

Web Summary : एआई ने चिप्स को बंदूक समझकर छात्र को गिरफ्तार करवाया। स्कूल ने गलती के लिए माफी मांगी।

Web Title : AI error: Chips mistaken for gun, student wrongly arrested.

Web Summary : AI misidentified a student's chips as a gun, leading to his arrest. School apologized for the mistake.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.