(Image Credit : dailymail.co.uk)
तुम्ही अनेक सिनेमांमध्ये पाहिलं असेल की, गुन्हेगारांकडून सत्य जाणून घेण्यासाठी लाय डिटेक्टर ही टेस्ट केली जाते. पण आता याच कामासाठी आणखी एक वेगळा उपाय समोर आला आहे. चौकशी दरम्यान गुन्हेगार खरं बोलतोय की खोटं हे त्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरून ओळखलं जाणार आहे.
लंडनच्या स्टार्टअप फेससॉफ्टने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने एक सिस्टीम तयार केली आहे. याने चेहऱ्याचे हावभाव पाहून खरं-खोटं जाणून घेता येईल. याची टेस्ट लवकर ब्रिटन आणि मुंबई पोलीस करणार आहेत. या एआय सिस्टीममध्ये ३० कोटींपेक्षा अधिक हावभावांचा समावेश करण्यात आला आहे.
कसं करेल काम?
स्टार्टअप कंपनी फेससॉफ्टनुसार, तुमच्या डोक्यात काय सुरू आहे. याची माहिती चेहऱ्यावरील बारीक हावभावावरून मिळते. मनोवैज्ञानिकांनी १९६० मध्ये पहिल्यांदा याचा शोध लावला होता. त्यांनी पहिल्यांदा हे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रूग्णांमध्ये पाहिलं होतं. हे लोक नेहमीच डोक्यात सुरू असलेल्या नकारात्मक विचारांना लपवत होते.
फेससॉफ्टचे फाउंडर डॉ. पोनिआह म्हणाले की, जर एखादी व्यक्ती जबरदस्तीने हसत असेल तर हे हावभाव त्यांच्या डोळ्यात दिसून येत नाही. हे एकप्रकारचं मायक्रो एक्सप्रेशन आहे. रिसर्चमध्ये इम्पीरिअल कॉलेज लंडनचे एआय एक्सपर्ट स्टेफिनोज यांच्यानुसार, विचारपूस करतेवेळी गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर दिसणारे अस्वाभाविक हावभावांना रेकॉर्ड केलं जाईल. त्यानंतर त्याचं विश्लेषण केलं जाईल.
एआय सिस्टीममध्ये अल्गोरिदम डेटाबेससोबत ३० कोटींपेक्षा जास्त मनुष्यांचे चेहऱ्याचे हावभाव स्टोर करण्यात आले आहेत. यात सर्वच वयोगटातील आणि सर्वच लिंगाच्या व्यक्तींचे फोटो टाकले आहेत. यात आनंद, भीती, आश्चर्य यांसारख्या अनेक भावनांचा समावेश आहे. हे चेहऱ्यावर कमी-जास्त दिसत असेल तर याची माहिती एआय सिस्टीमकडून मिळेल.
एआय एक्सपर्ट्सनुसार, फेशिअल रिकग्निशनचा वापर लोकांची सुरक्षा आणि देशाच्या विकासासाठी केला जाऊ शकतो. याच्या मदतीने गर्दीमध्ये असलेल्या रागिट माणसाचा शोध घेतला जाऊ शकतो. यूके आणि मुंबई पोलीस लवकर कैद्यांवर याचा ट्रायल करणार आहेत.