शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

डेटिंग वेबसाईट्सद्वारे मोठा 'गेम', हॅकर्सनी चोरला लाखो युजर्सचा डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 12:11 PM

जगभरातील जवळपास 70 वेबसाईट्स हॅक करण्यासाठी मार्केटिंग कंपनी Mailfire ने विकसित केलेलं सॉफ्टवेअर वापरण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर हा सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. याचवेळी डेटिंग वेबसाईट आणि ई-कॉमर्स वेबसाईटचा वापरही केला जातो. जर तुम्ही डेटिंग वेबसाईटचा वापर करत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे कारण याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डेटिंग वेबसाईट्सद्वारे हॅकर्सनी लाखो युजर्सचा डेटा चोरल्याची घटना समोर आली आहे. vpnMentor च्या एक रिपोर्टनुसार, वेबसाईट्सच्या एक लाखांहून अधिक युजर्सचा डेटा हा हॅकर्सच्या हाती लागला आहे. 

जगभरातील जवळपास 70 वेबसाईट्स हॅक करण्यासाठी मार्केटिंग कंपनी Mailfire ने विकसित केलेलं सॉफ्टवेअर वापरण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. अनसिक्यॉर्ड इलास्टिसर्च सर्व्हरच्या माध्यमातून हा डेटा लीक करण्यात आला आहे. त्यामुळे युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ब्लॅकमेलिंग आणि फ्रॉडचा धोका वाढला आहे. 882.1GB डेटा लीक झाला आहे. यामध्ये नोटिफिकेशन कॉन्टेंट, PII डेटा, प्रायवेट मेसेज, ऑथेंटिकेशन टोकन आणि लिंकसोबतच ईमेल कॉन्टेंटचा देखील समावेश आहे. 

'या' देशांतील युजर्सना बसला मोठा फटका 

रिसर्चर्सना हा डेटा लीक झाला याबाबत 31 ऑगस्टला माहिती मिळाली होती. 3 सप्टेंबर रोजी वेंडर्सबरोबर संपर्क केला आणि मेलफायरने सर्व्हर सुरक्षित केल्यानंतर डेटा लीकवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर युजर्सना देखील डेटा लीक झाल्याची माहिती दिली आहे. मेलफायरने याची जबाबदारी घेतली असून मोठा डेटा हॅक केल्याची माहिती मिळते आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, यूके, अमेरिका या देशांसह अन्य काही देशांतील युजर्सना याचा मोठा फटका बसला आहे. 

लीक झालेल्या डेटामध्ये युजर्सची महत्त्वाची माहिती

लीक झालेल्या PII डेटामध्ये युजर्सचं पूर्ण नाव, वय, जन्मतारीख, ईमेल, लोकेशन, अपलोड करण्यात आलेले प्रोफाईल फोटो आणि इतर खासगी तपशील यांचा समावेश आहे. हॅकर्सना ही सर्व माहिती मिळाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुगल प्ले स्टोरवरून जुलै आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान 17 धोकादायक अ‍ॅप्स हटवले आहेत. हे अ‍ॅप्स मेलवेयर इन्फेक्टेड होते. जुलैमध्ये टेक दिग्गजने प्ले स्टोरवरून 11 आणि काही दिवसांपूर्वी 6 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. आता गुगल वर हे 17 अ‍ॅप्स उपलब्ध नाहीत. या अ‍ॅप्सना डाऊनलोड करता येत नाही. 

गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 17 धोकादायक अ‍ॅप्स, फोनमधून करा डिलीट नाहीतर...

प्ले स्टोरवरून ज्या 17 अ‍ॅप्सना हटवण्यात आले असून ते सर्व जोकर नावाचे मेलवेयरच्या एका नवीन व्हेरियंटशी अफेक्टेड होते. Check Point च्या रिसर्चने जुलैमध्ये या मेलवेयर अ‍ॅप्सला शोधून काढले होते. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गुगल 2017 पासून या अ‍ॅप्सला ट्रॅक करीत होते. 11 अ‍ॅप्सला प्ले स्टोरवरून हटवल्यानंतर Joker मेलवेयर एका नव्या रुपात गुगल प्ले स्टोरवरून 6 दुसऱ्या अ‍ॅप्स म्हणून कार्यरत होते. आता या 6 अ‍ॅप्सना सुद्धा प्ले स्टोरवरून हटवले आहे. सायबर सिक्योरिटी फर्म Pradeo च्या माहितीनुसार, जवळपास 2 लाख वेळा हे 6 अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून  डाऊनलोड करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बापरे! कोरोना लसींच्या चाचण्यांची माहिती लपवताहेत कंपन्या, शास्त्रज्ञांनी केलं अलर्ट

तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी 

जय जिजाऊ, जय शिवराय! योगी सरकारच्या 'त्या' निर्णयावर फडणवीसांचं खास ट्विट, म्हणाले...

"मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जातोय"

"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान सुरू, हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

टॅग्स :technologyतंत्रज्ञान