दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; BSNL ने लॉन्च केला सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:48 IST2025-11-27T14:47:07+5:302025-11-27T14:48:52+5:30
एकदा रिचार्ज करा अन् वर्षभर निश्चिंत राहा!

दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; BSNL ने लॉन्च केला सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन...
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या लाखो ग्राहकांसाठी एक स्वस्त वार्षिक प्रीपेड प्लॅन बाजारात आणला आहे. वाढत्या स्पर्धेच्या काळात कंपनी सतत स्वस्त आणि फायदेशीर रिचार्ज पर्याय उपलब्ध करुन देत असून, अलीकडेच BSNLच्या नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन युजर्सदेखील जोडले आहेत.
₹2399 मध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी
BSNL ने आपल्या अधिकृत X (Twitter) हँडलवरून जाहीर केलेल्या या वार्षिक प्लॅनमध्ये खालील सुविधा मिळतात:
365 दिवसांची व्हॅलिडिटी
भारतभर अनलिमिटेड कॉलिंग
फ्री नॅशनल रोमिंग
दररोज 2GB हाय-स्पीड डेटा
100 फ्री SMS दररोज
हा प्रीपेड प्लॅन देशातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही राज्यातून त्याचा लाभ घेता येईल.
Life gets easier when your network is sorted for the entire year.
— BSNL India (@BSNLCorporate) November 27, 2025
Choose the #BSNL ₹2399 Annual Plan and enjoy 2 GB/Day, unlimited calling & 100 SMS/Day.
Now recharge via BReX: https://t.co/41wNbHpQ5c
#BSNLPlans#PrepaidPlans#BSNLAnnualPlanpic.twitter.com/2EvsrTFKhN
BiTV आणि OTT अॅक्सेस मोफत
BSNL आपल्या प्रत्येक प्लानसोबत BiTV चे मोफत सब्सक्रिप्शन देते.
यामध्ये ग्राहकांना 350+ लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, निवडक OTT अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळतो. यामुळे मनोरंजनाची सुविधा कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय उपलब्ध होते.
₹485 ला 72 दिवसांचा स्वस्त प्लॅन
वार्षिक प्लानसोबतच BSNL ने आणखी एक किफायतशीर पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
₹485 किंमत
72 दिवसांची व्हॅलिडिटी
दररोज 2GB डेटा
100 फ्री SMS
अनलिमिटेड कॉलिंग + फ्री नॅशनल रोमिंग
हा प्लॅन कमी खर्चात नियमित वापर करणाऱ्या युजर्ससाठी फायदेशीर मानला जात आहे.
4G विस्तारात मोठी गती, 5G लॉन्चची तयारी
BSNL ने अलीकडेच देशभरात एक लाख नवीन 4G टॉवर बसवले आहेत. सर्व 4G टॉवर 5G रेडी असून, स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. BSNL लवकरच 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली आणि मुंबईमध्ये 5G सेवा सुरू होणार आहे. यामुळे BSNL आधुनिक टेलिकॉम स्पर्धेत पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत स्पष्ट दिसतात.