२०२२ : Sex on the beach सह सर्वाधिक सर्च केल्या गेल्या या रेसिपी; मोदकानेही पटकावला दोन नंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 15:22 IST2022-12-07T15:21:30+5:302022-12-07T15:22:37+5:30
यंदा भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले असेल? जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत भारतीयांनी Sex on the beach सह Porn star martini सारख्या गोष्टी सर्च केल्या.

२०२२ : Sex on the beach सह सर्वाधिक सर्च केल्या गेल्या या रेसिपी; मोदकानेही पटकावला दोन नंबर
यंदा भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले असेल? जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत भारतीयांनी Sex on the beach सह Porn star martini सारख्या रेसिपी सर्वाधिक सर्च केल्या आहेत. नावे जरा विचित्र असली तरी भारतीयांनी यात रुची दाखविली आहे. खरेतर हे काही अॅडल्ट कंटेंट नाहीएत. तर या रेसिपी आहेत. याचबरोबर पनीर आणि मोदकही सर्वाधिक वेळा सर्च केले गेले आहेत.
गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या १० रेसिपी कोणत्या, याची यादी आली आहे.
- पनीर पसंदा
- मोदक
- Sex on the beach
- चिकन सूप
- मलाई कोफ्ता
- पॉर्न स्टार मॉर्टिनी
- मार्गारीटा पिझ्झा
- पॅनकेक
- पनीर भुर्जी
- अनारसे
या पदार्थांच्या रेसिपी सर्वाधिक सर्च करण्यात आल्या आहेत.
काय आहे पॉर्न स्टार मार्टिनी?
हे नाव वाचून तुम्हाला वाटलं असेल की, मार्टिनी एखादी पॉर्न स्टार आहे. पण असं काही नाहीये. मार्टिनी एक पेय पदार्थ आहे आणि याची रेसिपी कोरोना लॉकडाऊन दरम्यान लोकांनी खूप सर्च केली. कारण त्यावेळी लोक घरांमध्ये कैद होते आणि खाण्या-पिण्यावर एक्सपरिमेंट करत होते. त्यांच्यासाठी हा यूनिक आयटम सर्चचा विषय होता. सगळ्यांना हे ट्राय करायची होती. पॉर्न स्टार मार्टिनी एक क्लासिक फ्रूट कॉकटेल आहे. जे आपल्या नावामुळे फेमस आहे. 2021 मध्ये पोर्न स्टार मार्टिनी गुगलवर सर्च केलेल्या रेसिपीमध्ये 6 नंबरवर होतं.
काय आहे सेक्स ऑन द बिच रेसिपी...
Sex on the beach हे अल्कोहोलिक कॉकटेल आहे. हे व्होडका, पीच, संत्र्याचा रस आणि क्रॅनबेरीचा रस मिसळून बनवले जाते. सेक्स ऑन द बीच एक गाणे आहे, जे 2011 च्या कॉमेडी चित्रपटात टी-स्पूनने चित्रित केले होते. हे सामान्यत: बर्फात मिसळलेल्या हायबॉल ग्लासमध्ये दिले जाते. जे ऑरेंज स्लाइसने सजवलेले असते.