मोटारसायकलच्या धडकेत तरूण ठार; चालकाविरूद्ध गुन्हा दाखल
By संताजी शिंदे | Updated: May 23, 2024 18:56 IST2024-05-23T18:55:08+5:302024-05-23T18:56:45+5:30
धडकेत अभिषेक हेगळाडे हा गंभीर जखमी होऊन मरण पावला.

मोटारसायकलच्या धडकेत तरूण ठार; चालकाविरूद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : कोयना नगर चौकात झेब्रा क्रॉसिंगवरून कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर व इशारा न देता, मोटारसायकलला धडक देवून तरूणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारसायकल चालका विरूद्ध सलगरवस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अभिषेक चंद्रकांत हेगळाडे (वय २२ रा. सुतार अड्डा पाटील नगर, सोलापूर) हा सुदर्शन काळे याच्या सोबत १४ मे रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल (क्र.एमएच-१३ डीआर-२०९८) वरून जात होता. तो कोयना नगर येथील चौकातून रस्त्याच्या डाव्या बाजूने जात होता. दरम्यान समोरून जाणाऱ्या मोटारसाकल (क्र.एमएच-१३ डीएन-४८१५) चालकाने कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर व इशारा न दिला नाही.
अचानक मोटारसायकल उजव्या बाजूला वळवून अभिषेक हेगळाडे याला धडक दिली. धडकेत अभिषेक हेगळाडे हा गंभीर जखमी होऊन मरण पावला. तर त्याच्या पाठीमागे बसलेला सुदर्शन काळे हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी रविराज रेवणसिद्ध राजमाने (रा. सुतार अड्डा समोर पाटील नगर देगाव ता. उत्तर साेलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल भिमराव शेळके (रा. कोयना नगर, देगाव राेड) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गोविंद पवार करीत आहेत.