चंद्रभागा नदीत स्नान करताना जळगावच्या युवकाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 12:35 IST2018-08-29T12:31:50+5:302018-08-29T12:35:24+5:30

चंद्रभागा नदीत स्नान करताना जळगावच्या युवकाचा बुडून मृत्यू
पंढरपूर : विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले युवकाचा चंद्रभागेत स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे. या युवकाचे नाव राहुल रवींद्र काथार (वय २५, रा. जळगाव) असे आहे.
चंद्रभागा नदीपात्रामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आलेल्या चार युवक पाण्याचा अंदाज न आल्याने बोलत होते. मात्र त्याठिकाणी असलेल्या कोळी बांधवांनी त्या चार लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला़ यामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी भरत रवींद्र कासार, नितीन दत्तू दत्तू गोअर, रमेश अशोक सोनार व राहुल रवींद्र काथार हे चौघेजण पंढरपूर मध्ये आले होते. ते चौघे चंद्रभागा नदी पात्रात पवित्र स्नान करण्यासाठी आले.
चंद्रभागा नदी पात्रात जादा पाणी असल्याने चौघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही चौघेही बुडू लागले मात्र त्याठिकाणी असलेल्या कोळी बांधवांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला़ यादरम्यान बुडत असलेल्या तिघांना वाचवण्यात कोळी बांधवांना यश आले. परंतु राहुल रवींद्र काथार (वय २५ राहणार जळगाव) हा युवक पाण्यात बुडून प्रवाहाने बुडाला. मात्र काही वेळाने त्या युवकाला पाण्याबाहेर काढण्यात आले. परंतु त्याचा पाण्यामध्ये बुडवून मृत्यू झाला होता. याबाबतची खबर पंढरपूर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहेत़