चंद्रकांत पाटील यांच्या धमकीला आपण घाबरत नाही : संजय शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:57 AM2019-03-28T11:57:11+5:302019-03-28T12:02:58+5:30

सोनके (ता. पंढरपूर) येथे आ. दीपक साळुंखे यांच्या फार्महाऊसवर माढा मतदार संघातील राष्टÑवादी व काँग्रेस आमदारांसह पदाधिकाºयांची बैठक झाली.

You are not afraid of Chandrakant Patil's threat: Sanjay Shinde | चंद्रकांत पाटील यांच्या धमकीला आपण घाबरत नाही : संजय शिंदे

चंद्रकांत पाटील यांच्या धमकीला आपण घाबरत नाही : संजय शिंदे

Next
ठळक मुद्देमाढा लोकसभा मतदार संघातील माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, फलटण, सांगोला, माण, खटाव आदी तालुक्यातील राष्टÑवादी व काँग्रेसच्या आमदार व प्रमुख नेत्यांची बैठकमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दमबाजीला मी घाबरत नसल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले.

पंढरपूर : मी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता, यामुळे गद्दारीचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्यामुळे ग्रामीण भागात भाजपचे अस्तित्व निर्माण झाले आहे़ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दमबाजीला मी घाबरत नाही, असे लोकसभा माढा मतदार संघातील राष्टÑवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी सांगितले.

सोनके (ता. पंढरपूर) येथे आ. दीपक साळुंखे यांच्या फार्महाऊसवर माढा मतदार संघातील राष्टÑवादी व काँग्रेस आमदारांसह पदाधिकाºयांची बैठक झाली. बैठकीनंतर संजय शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संजय शिंदे म्हणाले, माझ्याविरुद्ध कोणताही, कुठलाही उमेदवार असू द्या, माझी तयारी झाली आहे. मी कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये, स्कॅन्डलमध्ये, संस्थेच्या लफड्यामध्ये अडकलो नाही. यामुळे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दमबाजीला मी घाबरत नसल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले.

माढा मतदार संघातील नेत्यांची बैठक
- माढा लोकसभा मतदार संघातील माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, फलटण, सांगोला, माण, खटाव आदी तालुक्यातील राष्टÑवादी व काँग्रेसच्या आमदार व प्रमुख नेत्यांची बैठक सोनके (ता. पंढरपूर) येथे झाली आहे. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते आ. गणपतराव देशमुख, आ. भारत भालके, आ. बबनराव शिंदे, आ. दीपक चव्हाण, रश्मी बागल, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, रामराजे निंबाळकर, माजी आ. दीपक साळुंखे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, जयमाला गायकवाड, युवराज पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत माढा मतदार संघात स्टार प्रचारकाच्या सभा घेणे, कार्यकर्त्यांकडून कशा पद्धतीने कामे करून घ्यायचे याबाबत चर्चा झाली़ तसेच ३ एप्रिल रोजी सकाळी ११़३० वाजता लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचे ठरविण्यात आले.

Web Title: You are not afraid of Chandrakant Patil's threat: Sanjay Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.