शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

World's Marathi Theater Day: सोलापुरी मातीचा सुगंध न्यारा; रंगभूमीसाठी ध्यास सारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 3:22 PM

रंगभूमीपासून चित्रपट, लघूटपटांपर्यंत सबकुछ क्षेत्रामध्ये सोलापुरी कलावंतांनी आपला ठसा उमठवत आपला बाणा कायम ठेवला आहे.

ठळक मुद्देसोलापूरच्या रंगभूमीवर प्रकाशझोत टाकताना आवर्जून अभिनेत्री सरला येवलेकर, फय्याज, दिग्दर्शक जब्बार पटेल, पद्माकर देव यांची नावे आपसूकच पुढे येतात. नव्वदीच्या दशकानंतर अतुल कुुलकर्णी, किशोर महाबोले, अशोक गोडगे यांनी सोलापूरचं नाव मुंबापुरीच्या मायानगरीत रुजली गेली.

विलास जळकोटकर / संजय शिंदे सोलापूर: एकेकाळी सांस्कृतिक कला प्रकारामध्ये पुण्यामुंबईबरोबरच कोल्हापूर अशाच नावांची चर्चा व्हायची. पण अलिकडे रंगभूमीपासून चित्रपट, लघूटपटांपर्यंत सबकुछ क्षेत्रामध्ये सोलापुरी कलावंतांनी आपला ठसा उमठवत आपला बाणा कायम ठेवला आहे. नव्या पिढीतील मंडळींनी रंगभूमीला वाहून घेत सोलापुरी मातीचा सुगंध दरवळत ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. ज्येष्ठ कलावंतांनी जपलेला रंगभूमीचा वारसा नव्या पिढीच्या तरुणाईनंही जपला आहे.

सोलापूरच्या रंगभूमीवर प्रकाशझोत टाकताना आवर्जून अभिनेत्री सरला येवलेकर, फय्याज, दिग्दर्शक जब्बार पटेल, पद्माकर देव यांची नावे आपसूकच पुढे येतात. नव्वदीच्या दशकानंतर अतुल कुुलकर्णी, किशोर महाबोले, अशोक गोडगे यांनी सोलापूरचं नाव मुंबापुरीच्या मायानगरीत रुजली गेली. रंगभूमीपासून या दिग्गजांनी सुरुवात केली.

 अलीकडच्या काळात अमीर तडवळकर, अमर देवकर यांनीही आपली मुसाफिरी चालवलीय. याच जोडीला प्रमोद खांडेकर, अश्विनी तडवळकर, अभिजित केंगार, वर्षा मुसळे, राधिका देवळे, श्रुती मोहोळकर, पूजा अचलकर, इम्तियाज मालदार,कृष्णा डोंगरे, संदीप पिटके, सुरज काळे, सुरज कोडमूर, नितीश फुलारी, अद्वैत कुलकर्णी, वैभव आंबेकर, श्रद्धा केदार, ममता बोल्ली, प्रथमेश माणेकर, सागर देवकुळे, अमृत ढगे, अमोल देशमुख, मिहिका शेंडगे, अरुंधती, शेट, पूजा सैंदाने अशी अनेक नावं सांगता येईल. याच जोडीला बालकलावंतांनीही रूपेरी पडदा गाजवायला सुरुवात केलीय.

‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाच्या माध्यमातून पंढरीच्या बालकलावंतांना संधी मिळाली. त्याचं या बालकलावंतांनी सोनं केलं. चित्रपटात मुक्ताची भूमिका केलेली सायली भंडारकवठेकर, गणूच्या भूमिकेतला पुष्कर लोणारकर आणि दुर्गेश बडवे यांंनी पहिल्या चित्रपटानं रसिक प्रेक्षकांना आपलंसं केलं. पुढे यादी लांबतच गेली. या बालकलावंतांनी आपली घोडदौड सुरु केलीय. मिलिंद बोकिलांच्या शाळा या चित्रपटातून अंशुमन जोशी, ‘देव देव्हाºयात नाही’ मधून समर्पित नाट्य मंदिरची यशश्री आमणे, सत्यशोधक या महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटात अनिशा जाधव हिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीय. अर्जुन दिड्डी या कलावंतानेही स्वच्छतेवर प्रकाश टाकणाºया शॉर्टफिल्ममधून छोट्या पडद्यावर प्रथमच पाऊल टाकलं.

अनुश्री गोळवलकर हिनं ‘आजोबा’, अभिलाषा बारडने ‘पारड’, मानस यलगुलवार यानं चांदोबा भागलास का? या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येण्याचा मान मिळवला सोलापूरच्या जोशी परिवाराच्या ‘खुलता कळी खुलेना’ या छोट्या पडद्यावरील मालिकेतून गार्गी जोशीने केलेल्या ‘इशा’ भूमिका साकरालीय. म्होरक्या लघुचित्रपटातून बार्शीच्या रमण देवकर या बालकलावंतांनं ठसा उमठवलाय.  सैराटच्या रूपानं नागराज मंजुळेला स्टार दिग्दर्शक म्हणून लोक ओळखायला लागले, त्याही पूर्वी त्यांनी निर्मित केलेला पिस्तुल्या या लघुुपटातून  करमाळा तालुक्यातील सूरज पवार, फॅँड्रीमधून समाधान अवघडेसारखे गुणी बालकलावंत पुढे आले. सैराटमधून पुढे आलेली अकलूजची रिंकू राजगुरु हिने तर सारे मापदंड मोडून काढत सातासमुद्री ख्याती मिळवली. हीच तर सोलापूरच्या मातीची खासियत आहे. हा सुगंध असाच दरवळत राहणार आहे. 

नागेंद्र माणेकरी : सोलापूरच्या रंगभूमीवरील हरहुन्नरी कलावंतसोलापूर : रेल्वेमध्ये लोकोपायलट म्हणून सेवेत असलेले व गेली ४५ वर्षे रंगभूमीची अखंडपणे सेवा करणारे नागेंद्र अंबाजी माणेकरी हे सोलापुरातील हरहुन्नरी कलावंत. बॅकस्टेज आर्टिस्टपासून सुरु झालेला हा प्रवास लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा नाट्यक्षेत्राशी संबंधित सर्वच क्षेत्रांशी नाते जोडत गेला.

इयत्ता तिसरीमध्ये असताना नागेंद्र यांनी पहिल्यांदा नाटकामधून भूमिका केली. रंगभूमीच्या आवडीतूनच १३ सप्टेंबर १९९० रोजी प्रख्यात नाट्यकलावंत कै. आनंद तुळशीगार व गझलकार कालिदास चवडेकर यांच्या मदतीने त्यांनी सोलापुरात ‘झंकार सांस्कृतिक मंच’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून आजवर त्यांनी अनेक मराठी व हिंदी नाटकांचे सादरीकरण करुन राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धा तसेच राज्य शासनाचे अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

स्वत:च नाटके लिहून त्यांचे दिग्दर्शन करणे हे नागेंद्र यांचे वैशिष्ट्य. २५ हून अधिक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले असून, ८ नाटके स्वत: लिहिली आहेत तर ५ नाटकांचा अनुवाद केला आहे. सामाजिक, दलित, ऐतिहासिक, पौराणिक, संगीत अशा विविधांगी नाटकांचे त्यांनी सादरीकरण केले आहे. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १३ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित कार्यक्रमात त्यांनी लिहिलेल्या राजा रविवर्मा यांच्यावर आधारित ‘संगीत चाफा सुगंधी’ या नाटकाचे प्रकाशन झाले. याच नाटकाने नंतर लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध क्षेत्रात अनेक पुरस्कार पटकावले.

तरुणाईचा कलाविष्कार- हर्षवर्धन नागेंद्र माणेकरी या कलावंतानं अनेक बालनाट्यातून आपला प्रवास सुरु केला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तो जोमाने वाटचाल करतो आहे.  याशिवाय  आकाश कनकी  या कलावंतानं मराठी, हिंदी नाटक, एकांकिकेतून आपला अभिनय दाखवताना  लघुपटात आपला ठसा उमठवला आहे. अरुंधती शेटे, पूजा सैंदाने, मिहिका शेंडगे या तरुणाईनंही बालनाट्यापासून ते मराठी हिंदी नाटके, एकांकिका, लघूपट, चित्रपटांमधून सोलापुरी बाणा जपण्याचा प्रयत्न चालवला आहे. शहर-जिल्ह्यात अशी कित्येक नव्या पिढीनं रंगभूमीसाठी आपली मुसाफिरी चालवली आहे.

सादर केलेली नाटके

  • - झंकार सांस्कृतिक मंचने पौर्णिमा (पुनवा), पूनम की चंदा, बाईसाहेब तुम्ही, निवडुंग, आकाश पेलताना, सारे प्रवासी तिमिराचे, माणूस म्हणतो माझे घर, सम्राट अशोक, रक्ताभिषेक, कंस-कथा अस्तित्वाची, अग्निदिव्य- एक अमृतगाथा, सांत्वन, युगांतर, उन्हातले चांदणे, प्रलय, भाकरीचा चंद्र, अस्तित्व, आगतिकता अशी विविध नाटके आजपर्यंत सादर केली आहेत.

तेलुगू कलावंताची पन्नास वर्षे अखंड सेवा

  • - तेलुगू मातृभाषा असूनही मराठी अणि तेलुगू रंगभूमीचा गेल्या पन्नास वर्षापासून वारसा जपणाºया सिद्राम गडगी यांचंही योगदान मोलाचे आहे. 
  • -आंध्र प्रजा नाट्य मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अनेक नाटकात त्यांनी आपल्या अभियनाचा बाज जपला आहे. अनेक स्त्री भूमिकाही त्यांनी साकारल्या आहेत. या जोडीला संगीत नाटकांमध्ये वादक म्हणूनही त्यांनी आपली खासियत जपली. प्रजा नाट्य मंडळाच्या माध्यमातून कलापथकाद्वारे प्रबोधनात्मक जनजागरण करण्याचाही प्रयत्न उल्लेखनीय ठरतो. वृद्ध कलाकारांसाठी आजही ते सक्रीय आहेत.
टॅग्स :SolapurसोलापूरmarathiमराठीAtul Kulkarniअतुल कुलकर्णी