सोलापुरातील कामगार तेलंगणात गेला; धरणात पोहत असताना मरण पावला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 18:30 IST2021-08-10T18:29:58+5:302021-08-10T18:30:03+5:30
लॉकडाऊनमुळे सोलापुरातील गारमेंट उद्योग बंद पडला. त्यामुळे कामाच्या शोधात शिवा सिरसिला गेला

सोलापुरातील कामगार तेलंगणात गेला; धरणात पोहत असताना मरण पावला !
सोलापूर : सोलापुरातील रेडिमेड कामगार शिवा मोहन वासम (वय-२३, रा. नीलमनगर) हा तेलंगणात गेला. तेथील धरणात पोहत असताना पाय अडकून मरण पावला. रविवारी सायंकाळी ४ वाजता हा प्रकार घडला.
त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच आई-वडिलांची शुद्ध हरपली. चार बहिणींमध्ये एकुलता एक मुलगा जग सोडून गेल्यामुळे ते पार हादरून गेले आहेत. अंत्यसंस्कारासाठी शिवाचे पार्थिव सोमवारी सोलापुरात आणले. शिवा हे सामाजिक कार्यकर्ते अनिल वासम यांचे चुलत भाऊ होत. त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे सोलापुरातील गारमेंट उद्योग बंद पडला. त्यामुळे कामाच्या शोधात शिवा सिरसिला गेला. रविवार सुटी असल्यामुळे तो मित्रांसोबत धरणात पोहायला गेला. उंच ठिकाणावरून तो धरणात उडी मारला. त्यामुळे गाळात त्याचे पाय फसून तो जागीच मृत्यू पावला.