The work of doubling the distance of 2.5 km was completed in six days | २३.५० किलोमीटर दुहेरीकरणाचे काम सहा दिवसातच केले पूर्ण

२३.५० किलोमीटर दुहेरीकरणाचे काम सहा दिवसातच केले पूर्ण

ठळक मुद्देदुहेरीकरणासाठी लागणारी दुरुस्तीची कामे शेकडो कर्मचाºयांनी दिवसरात्र एक करून पूर्ण केलेपाहणी दौरा संपला, या पाहणीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी निघाल्या नाहीत चाचणी यशस्वी होऊन या मार्गावरून रेल्वे धावण्यास हिरवा कंदील मिळाला

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात असलेल्या बोरोटी-दुधनी-कुलाली या २३़५ किलोमीटरपर्यंतच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले़ या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी मंगळवारी सोलापूर विभागातील वरिष्ठ अधिकाºयांच्या पथकाने केली़ उर्वरित वाडी ते सोलापूरपर्यंत शिल्लक २७ किलोमीटरचे काम मेअखेरपर्यंत पूर्णत्वास येईल, असे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे़ सध्या सोलापूर विभागाने सोलापूर ते वाडीपर्यंतच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्याचा निश्चिय केला आहे़ त्यानुसार बुधवार १९ फेबु्रवारी रोजी वाडी सेक्शनमधील बोरोटी-दुधनी-कुलालीदरम्यानचे काम हाती घेतले आहे़ हे २३़५० किमीचे काम सोमवारी संपविण्यात आले़ त्यानुसार मंगळवार २५ फेबु्रवारी रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र गुप्ता, रेल विकास निगम लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी आनंद स्वरूप, ए़ के. जैन, गौतमकुमार, एस़ के. निरंजन, आरपीएफ, लोहमार्गचे अधिकारी व कर्मचाºयांच्या उपस्थितीत पाहणी दौरा झाला़ उर्वरित सोलापूर ते वाडीपर्यंत २७ किमीचे काम मेअखेर पूर्ण करून विद्युतीकरणाच्या कामाला गती देण्यात येणार असल्याचेही रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.

या पूर्ण झालेल्या कामामुळे या मार्गावरील सर्वच रेल्वे गाड्या वेगाने धावणार असून, यामुळे सोलापूर ते हैद्राबाद व अन्य ठिकाणी प्रवास करणाºया प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे़ याशिवाय या मार्गावर भविष्यात गाड्यादेखील वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ 

सात तास चालला पाहणी दौरा...
- मागील सहा ते सात दिवसांपासून रेल्वेचा मेगाब्लॉक घेऊन सिग्नल दुरुस्ती, पटरी आपापसात जोडण्याचे तसेच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे आदी दुहेरीकरणासाठी लागणारी दुरुस्तीची कामे शेकडो कर्मचाºयांनी दिवसरात्र एक करून पूर्ण केले. 
सोलापूर ते वाडीदरम्यान नव्याने झालेल्या या बोरोटी-दुधनी-कुलालीपर्यंतच्या दुहेरीकरणाच्या कामाचा मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झालेला पाहणी दौरा दोन वाजता संपला. या पाहणीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी निघाल्या नाहीत. त्यामुळे चाचणी यशस्वी होऊन या मार्गावरून रेल्वे धावण्यास हिरवा कंदील मिळाला असल्याचेही रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले़ 

Web Title: The work of doubling the distance of 2.5 km was completed in six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.