शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

Women's Day Special : सोळा वर्षांच्या स्नेहल मोरे महाराजांची कीर्तन भक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:04 PM

जगन्नाथ हुक्केरी   सोलापूर : सांप्रदायिक कुटुंबात जन्म. घरातील सगळेच वारकरी असल्याने आपोआप ते संस्कार होत गेले. कीर्तन किंवा ...

ठळक मुद्देसमाजातील अंध रूढी, परंपरा, दांभिकतेचे उच्चाटन करण्याबरोबरच व्यसनमुक्त समाज घडविणे व देशसेवेसाठी चैतन्य निर्माण करण्याचे काम करणार असल्याचे ह. भ. प. स्नेहल महाराज मोरे यांनी सांगितले.कीर्तन हे संतांच्या काळापासून चालत आलेली भक्ती परंपरा आहे. यात समाजाचा उद्धार करण्याची मोठी ताकद आहे. आडमार्गाने म्हणजे वाम मार्गाला लागलेल्यांना बाहेर काढण्याची शक्ती आहे.

जगन्नाथ हुक्केरी सोलापूर : सांप्रदायिक कुटुंबात जन्म. घरातील सगळेच वारकरी असल्याने आपोआप ते संस्कार होत गेले. कीर्तन किंवा प्रवचन करणारे कोणीही घरात नसताना कीर्तन करण्याकडे कल वाढला आणि अवघ्या पंधराव्या वर्षी दहावीत शिक्षण घेत असतानाही ह. भ. प. स्नेहल मोरे महाराज जीवनाचे मूळ अन् कुळ कीर्तनातून सांगू लागल्या. आता त्या सोळा वर्षांच्या असून, अकरावीत शिकत आहेत.

बार्शी तालुक्यातील साकत हे त्यांचे मूळ गाव. प्राथमिक शिक्षणाचे धडे वैराग येथील अर्णव माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत घेतले. सध्या त्या अर्णव प्रशालेत कला शाखेत अकरावीमध्ये शिकत आहेत. वडील दत्तात्रय मोरे बांधकाम व्यावसायिक तर आई घरकामातच व्यस्त. अभ्यासाबरोबरच कीर्तनाचे धडे त्यांनी स्वत:हून आत्मसात केले. त्याला तसं कारणही होतं. ह. भ. प. सौरभ महाराज मोरे हे त्यांचे बंधू वयाच्या सातव्या वर्षांपासून मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजीतून कीर्तन करायचे. त्यांना साथसंगत करताना स्नेहल महाराजांना कीर्तन करण्याची कला आत्मसात झाली आणि त्या ‘जन्माचे ते मूळ पाहिले शोधून।। दु:खाशी कारण जन्म घ्यावा।।१।। पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी।। नरदेहा येवुनी हानी केली।।२।।’ असे जीवनाचे तत्त्वज्ञान कीर्तनातून सांगू लागल्या.

वडिलांची आई कोंडाबाई याही वारकरीच. वारकरी परंपरेतील संस्काराने त्या प्रेरित होऊन कीर्तन करू लागल्या. आजपर्यंत त्यांनी पुणे, जळगाव, सातारा, बुलढाणा, बार्शी तालुक्यातील साकत यासह अन्य ठिकाणी ३0-३५ कीर्तन केले आहे. मेमध्ये बाळे, सोलापूर येथे त्यांचे कीर्तन होणार आहे. सर्व संतांचे अभंग त्यांना मुखोद्गत आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांचा त्यांच्यावर पगडा आहे.‘जैसी गंगा वाहे तैसें त्याचें मन।। भगवंत जाण तया जवळी।।१।। याबरोबरच ज्याची त्याला पदवी येराला न साजे।। संताला उमजे आत्मसुख।।१।। या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील दृष्टांत देत कीर्तनातून स्नेहल महाराज सांगतात, ‘ आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी।। वाउगी चावटी नका करूं।।२।। लहान वयात त्या संत तुकारामांचा आधार घेत बाबा रे चावटी करू नका, असे ठणकावून सांगतात. ‘अहिनिशीं सदा परमार्थ करावा।। पाय न ठेवावा आडमार्गीं ।।१।।’ अवघ्या सोळाव्या वर्षी आडमार्गी जाऊ नका. जग उद्धारण्यासाठी आपला जन्म झाला आहे. शिस्तीत राहा, मस्तक ताठ ठेवा आणि अन्यायासमोर गुलाम होऊन झुकू नका, हा संदेश त्या कीर्तनातून देत आहेत. 

घरात बंधू सौरभ महाराज हे वयाच्या सातव्या वर्षांपासून कीर्तन करीत असल्याने त्यांना प्रेरणा मिळाली. पण स्नेहल महाराजांना त्यांचे वडील दत्तात्रय, आई, आजी भागीरथी खटाळ आणि आजोबा बुवासाहेब खटाळ यांचेही प्रोत्साहन मिळत गेले. यामुळे त्या उत्तमपणे कीर्तन करू लागल्या. अगदी पहिल्या कीर्तनापासूनच त्यांना सभाधीटपणा आल्याचे श्रोते सांगतात.

तबला अन् संगीताचे शिक्षण- कीर्तन करताना आवश्यक त्या सगळ्या गोष्टी त्यांना आत्मसात आहेत. याशिवाय त्या तबला आणि गायन विशारद आहेत. त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे लातूर येथील अमर कडतणे यांनी दिले तर सध्या त्या पुण्यात रघुनाथ खंडाळकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहेत. कीर्तन हे संतांच्या काळापासून चालत आलेली भक्ती परंपरा आहे. यात समाजाचा उद्धार करण्याची मोठी ताकद आहे. आडमार्गाने म्हणजे वाम मार्गाला लागलेल्यांना बाहेर काढण्याची शक्ती आहे. याच्या माध्यमातून समाजातील अंध रूढी, परंपरा, दांभिकतेचे उच्चाटन करण्याबरोबरच व्यसनमुक्त समाज घडविणे व देशसेवेसाठी चैतन्य निर्माण करण्याचे काम करणार असल्याचे ह. भ. प. स्नेहल महाराज मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरWomen's Day Specialजागतिक महिला दिन