किरकोळ कारणाने महिलेचा खून

By Admin | Updated: May 31, 2014 00:33 IST2014-05-31T00:33:46+5:302014-05-31T00:33:46+5:30

कुर्डूवाडी : आत्महत्या करुन आमचे नाव घेणार काय म्हणून महिलेला मारहाण करुन तोंड, नाक दाबून जीवे मरण्याची घटना आंबेडकर वसाहत, परंडा रोड, कुर्डूवाडी येथे दि.२७ रोजी सायं ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

The woman's blood for minor reasons | किरकोळ कारणाने महिलेचा खून

किरकोळ कारणाने महिलेचा खून

 

कुर्डूवाडी : आत्महत्या करुन आमचे नाव घेणार काय म्हणून महिलेला मारहाण करुन तोंड, नाक दाबून जीवे मरण्याची घटना आंबेडकर वसाहत, परंडा रोड, कुर्डूवाडी येथे दि.२७ रोजी सायं ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. राधिका सडकेन भोसले (वय २५) असे मयत महिलेचे नाव आहे. बारलोणी येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरुन मयत राधिका सडकेन भोसले हिीने राहत्या घरी स्वत:ला गळफास घेताना शेजारील लोकांनी तिला सोडविले. यामुळे आरोपी कक्या सुभाष शिंदे व भारती कक्या शिंदे यांनी तू आमच्यामुळे आत्महत्या करुन आमचे नाव घेणार का म्हणून चिडून जाऊन तिला मारहाण करुन धमकी दिली व हातपाय पकडून नाक, तोंड दाबून जीवे मारले. याबाबत बदामबाई श्रीमंत काळे (वय ४५, रा.आंबेडकर वसाहत, परंडा रोड, कुर्डूवाडी) यांच्या फिर्यादीवरुन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजीराव सोनवणे हे करीत आहेत.

 

Web Title: The woman's blood for minor reasons