भांडण नडलं.. पारा चढला, महिलेनं घेतला गळफास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 19:50 IST2024-04-16T19:47:43+5:302024-04-16T19:50:22+5:30

शेजारी धावले : रुग्णालयात उपचार सुरु.

woman hanged herself | भांडण नडलं.. पारा चढला, महिलेनं घेतला गळफास!

भांडण नडलं.. पारा चढला, महिलेनं घेतला गळफास!

विलास जळकोटकर / सोलापूर : घरामध्ये झालेल्या कुरबुरीतून किरकोळ भांडण झाले. यातून रागाच्या भरामध्ये एका महिलेनं राहत्या घरी ओढणीच्या सहाय्यान गळफास घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच शेजारी धावले. तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. उळे कासेगाव (ता. द. सोलापूर) येथे ११.४५ च्या सुमारास ही घटना घडली. चंद्रभागा गणेश मारडकर (वय- ३२) असे या महिलेचे नाव आहे. 

सोलापूरपासून २० किलोमीटर अंतरावरील उळे कासेगाव येथे राहणाऱ्या चंद्रभागा गणेश मारडकर यांच्या घरी सोमवारी रात्री घरगुती कुरबुरीतून भांडण पेटले. यात सदर महिलेला राग सहन झाला नाही. यातूनच तिने ओढणीच्या सहाय्याने घरामध्येच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ोशेजारी असलेल्या दीर शंकर मारडकर यांनी पाहिला. आरडाओरड करुन तातडीने गळफास सोडवला. येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरु केले असून, ती शुद्धीवर असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: woman hanged herself