शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुक प्रचाराच्या परवानगीसाठी एक खिडकी सुरू; जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले याची माहिती

By appasaheb.patil | Updated: March 11, 2019 18:21 IST

  सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार करण्यासाठीच्या आवश्यक परवानगी देण्यासाठी एक खिडकी सुरु करणार आहे. मात्र परवानगी घेण्यासाठी राजकीय ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक निवडणुकीत राजकीय पक्षांना प्रचार करण्यासाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुरु आवश्यक परवानगी मिळण्यासाठी राजकीय पक्षांनी मुदतीत अर्ज करणे आवश्यक

 सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार करण्यासाठीच्या आवश्यक परवानगी देण्यासाठी एक खिडकी सुरु करणार आहे. मात्र परवानगी घेण्यासाठी राजकीय पक्षांनी विहित मुदतीत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भासले आज येथे केले.

लोकसभा निवडणूक  व आदर्श आचारसंहिता संदर्भात राजकीय पक्षांना माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी  स्नेहल भोसले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी महेश आवताडे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.भोसले म्हणाले, निवडणुकीत राजकीय पक्षांना प्रचार करण्यासाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुरु करण्यात येणार आहे.मात्र आवश्यक परवानगी मिळण्यासाठी राजकीय पक्षांनी मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे.यामध्ये प्रचारसभा, रॅली, लाऊड स्पिकर, मंडप यासह आवश्यक बाबींच्या परवानगीसाठी मुदतीत अर्ज करावेत.

डॉ. भोसले म्हणाले,  भारत निवडणूक आयोगाने १० मार्च २०१९ पासून लोकसभा निवडणूक २०१९ साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. जिल्ह्यात  आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून राजकीय पक्षांनी देखील आचारसंहितेचे पालन करावे.  राजकीय पक्षांनी लावलेले  बॅनर्स, पोस्टर्स, कटआऊट तात्काळ काढून घ्यावेत. अनधिकृतपणे बॅनर्स, पोस्टर्स, कटआऊट आढळून आल्यास निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधितावर कारवाई करण्यात येइील.राज्यात प्लॅस्टिक वापरावर बंदी असल्याने राजकीय पक्षानी प्लॅस्टिकचा वापर टाळावा.

डॉ. भोसले म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयार केली असून निवडणूकीसाठी  कार्यान्वित करण्यात आलेल्या सर्व कक्षांचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. आचारसंहितेबाबत काही शंका असल्यास संबंधितानी आचारसंहिता कक्षाकडे संपर्क साधावा.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Solapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूकPoliticsराजकारण