शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या माध्यमातून प्रश्न सोडविणार

By admin | Updated: June 15, 2014 00:40 IST

सांगोला : २० जूनला शहाजीबापू पाटील शिवसेनेत प्रवेश करणार

सांगोला : शिवसेनेत प्रवेश करताना विधानसभेच्या उमेदवारीची अपेक्षा न बाळगता तालुक्याच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून आपण प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्याच्या जनतेचा पाणीप्रश्न सेना-भाजप महायुतीच प्राधान्याने सोडवेल, असा माझा विश्वास आहे. येत्या शुक्रवारी २० जून रोजी आपण शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे माजी आ. अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, जिल्हा उपप्रमुख सूर्यकांत घाडगे, पंढरपूर तालुकाप्रमुख संभाजी शिंदे, सांगोला शहरप्रमुख कमरूद्दीन खतीब, तालुकाप्रमुख मधुकर बनसोडे या पदाधिकारी, शिवसैनिकांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व सत्कार करून स्वागत केले. शनिवारी दुपारी अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या सांगोल्यातील निवासस्थानी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षप्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केली. सांगोला तालुक्याच्या दुष्काळी जनतेचे रखडलेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी १९९९ ते २०१४ पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस व शेकाप हे तिन्ही पक्ष सत्तेत असताना व माढा मतदारसंघाचे तत्कालीन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार नेतृत्व करीत असताना या योजनेची कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. सांगोला तालुका पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून सन १९९४ साली कृष्णेचे पाणी शेतीला व भीमेचे पाणी पिण्यासाठी सर्व गावांना मिळावे ही संकल्पना मी मांडली होती. टेंभू - म्हैसाळ योजना, उजनीचे उचल पाणी नीरा- उजवा कालव्यात टाकणे हे मुद्दे घेऊन जनतेसमोर मांडले होते. त्यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी व इतर नेत्यांनी मला हसून लबाड ठरवित होते, मात्र तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने सेना-भाजप सरकारने उचलला. त्यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर गेल्या १५ वर्षांत तालुक्याच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही, असे अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ---------------------------ज्यांना विचारधारा आवडेल त्या सर्वांना सोबत घेऊन पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगून जे येणार नाहीत त्यांना आग्रह करणार नाही. शिवसेनेतील सर्व पदाधिकारी शिवसैनिकांचा सन्मान राखून त्यांच्या आदेशानुसार काम करू.- अ‍ॅड. शहाजीबापू पाटीलमाजी आमदार