शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का ? जयंत पाटील यांनी दिले हे उत्तर...! 

By appasaheb.patil | Updated: March 30, 2021 12:54 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर - राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना, तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी भगीरथ भालके अन् समाधान आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीचे बडे नेते पंढरपुरात दाखल झाले आहेत. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शरद पवार हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांना किडनी स्टोनचा त्रास होत आहे. आवश्यकतेनुसार येत्या काही दिवसात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होईल, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते बाहेर पडतील, मात्र आम्ही त्यांना सांगितले आहे की, पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची आपण काळजी करु नका,  हा मतदारसंघ पवार साहेबांना मानणारा वर्ग असलेला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काम करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगणार आहोत की, वैद्यकीय सल्ला मिळाल्यानंतरच आपण या निवडणुकीच्या प्रचारात उतरा.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलElectionनिवडणूकpandharpur-acपंढरपूर