शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पशुप्राण्यांच्या अस्तित्वासाठी वन्यजीव मातेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:13 PM

पाणवठ्यांची निर्मिती;  कंदलगावच्या माळरानावर वनराई फुलवण्यासाठी प्रयत्न

ठळक मुद्दे जशी मुलांची शाळा फुलवली तशी चिमण्यांची आणि अन्य पशुपक्ष्यांची शाळा भरवण्याचे स्वप्नपशु-पक्ष्यांबद्दल प्रेम वाढावे, मानवता निर्माण व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना दिवसभरातील काही वेळ याचे धडेमाळरानावर चिवचिवाट बहरावा म्हणून वर्षभरात हजार वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेतली

काशिनाथ वाघामारे 

सोलापूर : अनेक वर्षे शैक्षणिक सेवेतून सरस्वतीची पूजा करणाºया वन्यजीवमातेने यंदा उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी माळरानावर पाणवठे तयार केले आहेत. तसेच या माळरानावर चिवचिवाट बहरावा म्हणून वर्षभरात हजार वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. बस्स ! गरज आहे...सर्वसामान्यांच्या योगदानाची.

अपर्णा बिराप्पा शेजाळ असे त्या वन्यजीव मातेचे नाव. दक्षिण सोलापूर तालुक्यात कंदलगाव परिसरात ओसाड माळरानावर खासगी शाळा आणि महाविद्यालय उभारत असताना स्वत: परिश्रमातून असंख्य झाडी फुलवली़ येथून कोणी जात असेल तर हिरवळ आणि झाडी पाहून थोडा विसावा घेतो. जशी मुलांची शाळा फुलवली तशी चिमण्यांची आणि अन्य पशुपक्ष्यांची शाळा भरवण्याचे स्वप्न बाळगून या परिसरात चिमण्यांसाठी घरटी लटकावताहेत. पशु-पक्ष्यांबद्दल प्रेम वाढावे, मानवता निर्माण व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना दिवसभरातील काही वेळ याचे धडे त्या देतात तसेच शाकाहाराचे महत्त्वही त्या विद्यार्थ्यांना पटवून सांगतात.

 इतकेच नव्हे तर स्वत:च्या घराभोवतीही पक्ष्यांसाठी पाण्याच्या लोटकी आणि खाद्यासाठी भांडी लावली आहेत. घरातून शाळेला निघताना त्या पिशवीत काही प्रमाणात धान्य घेऊन निघतात आणि गावच्या माळरानावर पशुपक्ष्यांना घालतात़ हाच प्रयोग त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही करत आहेत़ आज त्यांच्या शिकवणीनुसार बहुतांश विद्यार्थी घरातून निघताना बाटलीभर पाणी आणतात आणि माळरानावर वाळणाºया झाडाला ते घालतात.

पर्यावरण आणि वन्यजीवाचा हा लळा त्यांना वडील मेजर शंकरराव खांडेकर आणि आई सिंधूताई खांडेकर यांच्याकडून लागला़ त्यांच्या या माणुसकीच्या कार्यात पती प्रा़ बिराप्पा शेजाळ हेदेखील सहभागी होतात़ 

शिकाºयाच्या तावडीतून हरणाची सुटका दक्षिण सोलापूर परिसरात हरणांचे प्रमाण आहे़ उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात हे वन्यजीव विहिरीपर्यंत जातात़ मागे दोन वर्षांपूर्वी असेच एक हरीण कंदलगाव परिसरात कोरड्या विहिरीत कोसळले़ या परिसरातील काही शिकारी लोक त्याला विहिरीतून बाहेर काढून लपवत घेऊन निघाले होते़ शाळेतून बाहेर पडलेल्या शेजाळ यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर त्यांना पोलिसांची आणि वनकायद्याची भीती घालून शिकाºयाच्या तावडीतून मुक्या जीवाची सुटका केली़ जखमी हरणावर उपचार करुन वनविभागाकडे त्याला सोपवले़ या आठवणीने त्यांच्या मुक्याजीवांविषयी असलेले प्रेम आणखी गडद करते.

भारतीय पक्ष्यांचे एक वैशिष्ट्य आहे की, ते घरटी केवळ भारतीय वृक्षावरच करतात़ सध्या महाराष्ट्रासह सोलापुरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आणि स्मार्ट सिटीत व्हीआयपी रोडवर परदेशी झाडं यापूर्वीच लावली गेली आहेत. या झाडावर एक पक्षीही बसत नाही, ना वास्तव्य करते़ त्यांच्या गरजा ओळखून कंदलगाव परिसरात रस्त्याच्या दुतर्फा हजार झाडी लावत आहोत़ त्यांच्यासाठी कृ त्रिम घरटी बसवत आहोत़ खाद्यही पुरवत आहोत़- अपर्णा शेजाळ, वन्यजीव माता

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentवातावरणwater shortageपाणीटंचाई