मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:20 IST2025-09-05T16:15:45+5:302025-09-05T16:20:08+5:30
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथील बेकायदा मुरुम उपसा प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करुन आयपीएस अधिकाऱ्यांना सुनावले होते.

मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथील बेकायदा मुरुम उपसा प्रकरण राज्यभर चर्चेत आले आहे. या प्रकरणी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी कारवाई केली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉल करुन अधिकाऱ्यांना सुनावले होते, गावकऱ्यांनी हा मुरुम कोणत्या कारणासाठी उपसला याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
कुर्डू गावातील बेकायदा मुरूम उपसा प्रकरणावरून करमाळा डीवायएसपी असणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यातील फोनचे संभाषण व्हायरल झाले. त्यात अजित पवारांनी या महिला अधिकाऱ्याशी बोलताना ज्या पद्धतीने भाषा वापरली, त्यानंतर नवीन वाद निर्माण झाला. पण, गावकऱ्यांनी नेमका हा मुरुम कशासाठी उपसला यावरुन चर्चा सुरू आहेत. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने याबाबत गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत.
कुर्डू या गावातील ग्रामस्थांना रस्त्याच्या अभावी आणि इतरही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक महिन्यांपासून खराब रस्ता आहे. त्यातूनच ही घटना घडल्याचे समोर आलं. येथील ग्रामस्थांनी पानंद रस्त्यामध्ये गावच्या रस्त्याचे काम सुरू केले होते आणि त्याला हा मुरुम सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या कामासाठी ग्रामपंचायतने ठराव केला आहे. याशिवाय सर्व कागदपत्रेही ग्रामस्तांकडे आहे. पण अचानक आयपीएस अंजना कृष्णा यांनी ही करवाई केली. यातून पुढे वाद वाढला. महिला अधिकारी अंजना कृष्णा यांना मराठी येत नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. यातच गावकरी विरोधात प्रशासन असा वाद वाढला. यामुळे अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन जोडून देण्यात आला. कारवाईदरम्यान अंजना कृष्णा या पोलीस गणवेशात नव्हत्या. याशिवाय त्यांच्या सुरक्षारक्षकाने मुरुम घेऊन जाणाऱ्या गाडी ड्रायव्हरला रिव्हॉल्वर लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
मुरुम उपसाबाबत कारवाईचे काम हे महसूली असताना आयपीएस असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यामपुळे वादज वाढल्याचे मत गावकऱ्यांचे आहे. या सर्व प्रकारात चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाल्याचा आरोपही गावातील लोकांनी केला आहे.