विरोधात स्टेट्स का ठेवतो? म्हणत चौघांनी केली मारहाण

By शीतलकुमार कांबळे | Updated: March 14, 2024 19:47 IST2024-03-14T19:45:43+5:302024-03-14T19:47:46+5:30

चौघाजणांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्याने, दगड, रॉड, काठीने मारहाण करत जखमी केले.

Why put the States against four of them beat him up in solapur | विरोधात स्टेट्स का ठेवतो? म्हणत चौघांनी केली मारहाण

विरोधात स्टेट्स का ठेवतो? म्हणत चौघांनी केली मारहाण

कुर्डूवाडी (सोलापूर): तू माझ्याविरूद्ध स्टेट्स का ठेवतो असे म्हणून चौघाजणांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्याने, दगड, रॉड, काठीने मारहाण करत जखमी केले. तसेच गळ्यातील दोन तोळ्याची चेन व तीन हजार रुपये घेऊन गेले. ही घटना जुन्या एसबीआय बँकेसमोर कुर्डूवाडी येथे घडली. याबाबत चेतन रामलिंग बागल (रा. कुर्डूवाडी )याने चौघा जणांवर फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी चेतन बागल हा आपल्या बहिणीला मोटारसायकलवरुन रेल्वेस्टेशन येथे सोडून घरी जात असताना जुन्या एसबीआय बँकेसमोर निहाल शेख, अरबाज बागवान, साहील तांबोळी (सर्व रा.कुर्डूवाडी) व एक अनोळखी व्यक्ती हे उभे होते. त्यापैकी फिर्यादीच्या ओळखीचा अरबाज याने थांब म्हणून फिर्यादीला मोटारसायकलवरुन जात असताना थांबविले. निहाल शेख याने तू आमच्या विरुद्ध स्टेट्स का ठेवतो म्हणत शिवीगाळ करत हातातील काठीने फिर्यादीच्या कपाळावर मारले. अरबाज बागवान याने हातात दगड घेऊन फिर्यादीच्या पाठीत मारला.

तू आमच्या विरूद्ध स्टेट्स का ठेवतो? असे म्हणून शिवीगाळ करुन, साहील तांबोळी याने त्याच्या हातातील रॉडने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पोटरीवर मारले. अन्य अनोळखी व्यक्तीने लाथाबुक्क्याने मारले. यावेळी अरबाज बागवान याने फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन काढून घेतली तर निहाल शेख याने फिर्यादीच्या पँन्टच्या डाव्या खिशातील ३ हजार रुपये काढून घेतले. चेतन बागल याच्या फिर्यादीवरुन वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Why put the States against four of them beat him up in solapur