लाच स्वीकारताना रेल्वेच्या अधिकाºयास रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 08:50 PM2019-11-13T20:50:41+5:302019-11-13T20:58:35+5:30

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयातील घटना; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

While accepting bribe, a railway officer was arrested by Ranghaath | लाच स्वीकारताना रेल्वेच्या अधिकाºयास रंगेहाथ पकडले

लाच स्वीकारताना रेल्वेच्या अधिकाºयास रंगेहाथ पकडले

googlenewsNext
ठळक मुद्दे- ३० हजाराची लाच स्वीकारताना केली कारवाई- सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई- टेंडर पास झाल्यानंगर अ‍ॅग्रीमेंटसाठी मदतीसाठी घेतली लाच

सोलापूर : रेल्वे सफाईचे टेंडर पास झाल्यानंतर अ‍ॅग्रीमेंटसाठी मदत केल्यामुळे बक्षीस स्वरूपात लाचेची मागणी करून ३0 हजाराची रक्कम स्वीकारताना, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अभियंत्यास रंगेहाथ पकडले़ ही कारवाई बुधवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

दीपक सदाशिव खोत (वय ४३ रा. रेल्वे क्वॉर्टस, रेल्वे लाईन सोलापूर, मुळ गाव डोंगरवाडी ता. वाळवा, जि. सांगली) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. दीपक खोत हे रेल्वेमध्ये डिव्हिजनल मेकॅनिकल इंजिनिअर म्हणुन कार्यरत आहे.

तक्रारदाराला कलबुर्गी-हैद्राबाद रेल्वे सफाईसाठी ५९ लाख ३८ हजार १७८ रूपयाचे टेंडर मंजुर झाले आहे. टेंडर मंजूर झाल्यानंतर त्याचे करारपत्र (अ‍ॅग्रीमेंट) सोलापुरातील रेल्वे कार्यालयात करावे लागते. करारपत्र करताना अभियंता दीपक खोत याने मदत केल्याचे बक्षीस म्हणुन एकूण बिलाच्या एक टक्का ६0 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. भविष्यात वेळोवेळी करण्यात येणाºया कामाचे बिल काढण्यासाठी मदत करतो असे अश्वासन दिले. लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती. बुधवारी पडताळणी केली असता, अभियंता दीपक खोत याला पहिला हप्ता ३0 हजार रूपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले़ ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, कविता मुसळे, सहायक फौजदार निलकंठ जाधवर, महिला पोलीस नाईक अर्चना स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार, देशमुख यांनी पार पाडली.


 

Web Title: While accepting bribe, a railway officer was arrested by Ranghaath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.