शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाके कधी बंद होणार ?

By admin | Updated: June 11, 2014 00:32 IST

आमदारांनो लक्ष द्या : शहरातील रस्ते खराब; तरीही वाहनधारक देताहेत टोल

सोलापूर:महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) शहरात केलेले रस्ते पूर्णपणे खराब झाले असताना चार ठिकाणी टोल द्यायचा कशाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला; मग सोलापूरबद्दल आवाज कोण उठविणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़याबाबत सोलापुरातील आमदारांकडेच लक्ष लागले आहे़ एमएसआरडीसीने टोलच्या माध्यमातून सुमारे ३० कोटींचा गल्ला जमा केला आहे़ कोल्हापुरात सोलापूर शहराच्या कितीतर पटीने रस्ते विकास महामंडळाने मजबूत आणि चांगले रस्ते केले, नियमानुसार कोल्हापूरकरांनी टोल दिलाच पाहिजे, असे असतानाही तेथील नागरिक टोलविरोधात रस्त्यावर उतरतात़ सोलापुरातील स्थिती मात्र विचित्र आहे़ एमएसआरडीसीने केलेले सर्व रस्ते खराब झाले आहेत़ एकाही रस्त्याचा टोल द्यावा अशी स्थिती नसताना सोलापूर-बार्शी, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-होटगी आणि सोलापूर-देगाव या मार्गावर टोलवसुली गेल्या ८ वर्षांपासून सुरू आहे़ टोलवसुली एमएसआरडीसीकडे आणि देखभाल दुरुस्ती महापालिकेकडे असा अजब करार मनपा आणि एमएसआरडीसीमध्ये झाला आहे़ दुसऱ्या टप्प्याचा पत्ता नाही, पहिल्या टप्प्यातील रस्ते अर्धवट आणि तेही उखडलेले असे असताना टोलवसुली सुरू आहे़ सध्या टोलनाक्यावर एईपी ही कंपनी टोल वसूल करीत आहे़शहरात ९१़५० कोटींचा रस्ते प्रकल्प असताना अवघ्या ७८ कोटींचे रस्ते झाले़ १ जून २००६ पासून या रस्त्यावर टोलवसुली सुरू आहे़ शिवाजी चौक ते सम्राट चौक ते दयानंद महाविद्यालय, जुना बोरामणी नाका ते शांती चौक, अशोक चौक, गुरुनानक चौक ते विजापूर रोड हा रिंगरुट रस्ता, रिपन हॉल ते पार्क चौक ते भैय्या चौकमार्गे कोयनानगर रस्ता, सरस्वती चौक ते होटगी रोड रस्ता, जुना पुणे नाका ते अवंतीनगर, मोदी पोलीस चौकी ते विजापूर रोड क्रॉस आणि बाळे गावातील मुख्य रस्ता हे रस्ते विकास महामंडळाने केलेले आहेत़ यातील एखादा रस्ता सोडला तर एकही रस्ता चांगला नाही. तरीही बाळे, अक्कलकोट रोड, सिद्धेश्वर कारखाना आणि देगाव येथे एमएसआरडीसीच्या वतीने टोलवसुली करण्यात येते़ हा टोल आणखी २१ वर्षे वसूल केला जाणार आहे़ याबाबत आता लोकप्रतिनिधी आणि सुज्ञ नागरिकांनी आवाज उठविला पाहिजे़ -------------------------टोल बंदची घोषणा; मात्र टोल सुरूचशासनाने विधानसभेत राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला़ यामध्ये सोलापुरातील आठ टोलनाक्यांचा समावेश आहे़ मात्र मंगळवारी या ठिकाणी टोलवसुली सुरूच होती़ कुर्डूवाडी बाह्यवळण, मरवडे चेकपोस्ट, पंढरपूर-मोहोळ, सोलापूर-बार्शी, दुधनी नाका, करमाळा बाह्यवळण, कासेगाव टोलनाका आणि मांगी टोलनाका बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू केली नाही़सोलापुरात देगाव, बार्शी नाका, अक्कलकोट नाका आणि होटगी रोडवरील साखर कारखाना या चार ठिकाणी एमएसआरडीसीचे टोल नाके आहेत.----------------------------शहरातील एमएसआरडीसीकडून केलेले रस्ते अत्यंत खराब झाले असून त्याची देखभाल दुरुस्ती देखील केली जात नाही. त्यामुळे टोल कशासाठी द्यायचा? हा प्रश्न आहे़ मुख्यमंत्र्यांना बुधवारी भेटून हे टोल बंद करावेत, अशी मागणी करणार आहे़- दिलीप मानेआमदार, दक्षिण सोलापूर