शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुशीलकुमार शिंदेंनी विकास केला असता तर मी मंत्री झालो नसतो; सहकारमंत्र्यांची खोचक प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 10:43 IST

जिल्ह्यात दोन्ही देशमुख चांगल्या प्रकारे सेवा करीत आहेत. 

ठळक मुद्देदुष्काळ जाहीर करणे हे कें द्राच्या हातात - देशमुखशेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना जास्तीत जास्त मदत करू - देशमुख

पंढरपूर : माजी कें द्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोघेही जिल्ह्याच्या कोणत्याही फायद्याचे नाहीत, असे विधान केले़ याबाबत देशमुख म्हणाले, या महाशयांनी जिल्ह्याचा विकास केला असता तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्री म्हणून जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळालीच नसती, अशी खोचक प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यात दोन्ही देशमुख चांगल्या प्रकारे सेवा करीत आहेत. त्यामुळे बºयाच जणांना सध्या पोटदुखी झालेली आहे. कसं आहे की, मासा पाण्याबाहेर काढला की तो तडफडतो तसेच हे सध्या तडफडायला लागले आहेत.

पंढरपूर येथे भाजपा पदाधिकाºयांचा मेळावा आयोजित केला़ त्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ सहकारमंत्री देशमुख म्हणाले, देशात नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी ज्याप्रमाणे आम्ही लागू केल्या, त्याप्रमाणे दुष्काळी परिस्थितीमध्ये निश्चितपणे शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना जास्तीत जास्त मदत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील सरकारमध्ये ‘दुष्काळ’ हा शब्द उच्चारण्याचेही धाडस होत नव्हते़ दुष्काळासारख्या परिस्थितीत ‘टंचाईग्रस्त’ असा शब्दप्रयोग करून ते दुष्काळग्रस्त जनतेची दिशाभूल करीत होते. मात्र सध्याचे सरकार ‘दुष्काळसदृश’ असा शब्द वापरत आहे. 

दुष्काळ जाहीर करणे हे कें द्राच्या हातात असते. त्यामुळे आमचे सरकार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य दाखवून देण्यासाठी टंचाईग्रस्त असा शब्द न वापरता दुष्काळसदृश या शब्दाचा वापर करीत आहे, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले़ याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, महिला आघाडीच्या शकुंतला नडगिरे, राजाभाऊ जगदाळे, शंतनू दंडवते उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखBJPभाजपाcongressकाँग्रेस