शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

आंबेडकर काँग्रेससोबत आल्यास माझा पक्ष ‘वंचित’मध्ये विलीन : लक्ष्मण माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 4:21 PM

‘ईव्हीएम’च्या विरोधासाठी मतदारसंघात १०० उमेदवार उभे करा

ठळक मुद्देसध्या महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, मुस्लीम लीगसह दोन  पक्षांनी एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला - लक्ष्मणराव मानेआमची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहे - लक्ष्मणराव मानेमहाराष्ट्र बहुजन आघाडीने ३३ तर मुस्लीम लीगने १५  जागांची मागणी केली - लक्ष्मणराव माने

सोलापूर : प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझे काही वैयक्तिक भांडण नाही. प्रकाश आंबेडकर जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांबरोबर येण्यास तयार असतील तर माझा महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी हा पक्ष त्यांच्या आघाडीत विलीन करायला आपण तयार आहोत, असे प्रतिपादन या पक्षाचे प्रमुख, माजी आमदार लक्ष्मणराव माने यांनी केले.

 

दरम्यान, जे लोक ईव्हीएम विरोधात आहेत, त्यांनी आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी भरावी. एका मतदारसंघात शंभर ते दीडशे उमेदवार लढल्यास ईव्हीएमची यंत्रणा कोसळणार आहे. तेव्हा मतपत्रिकेवरच निवडणुका घ्याव्या लागतील, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी आणि मुस्लीम लीगच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत माने बोलत होते. ते पुढे म्हणाले , आज  भाजप देशाचे संविधान बदलत आहे. ३७० कलम ज्याप्रमाणे हटवले हे त्याचे उदाहरण आहे. भाजप जरी पडद्यावर असला तरी ‘आरएसएस’ ही  संघटना देश चालवत आहे. त्यासाठी भाजपला आज हरवणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे शत्रू ते आमचे मित्र अशी आपली भूमिका आहे. भाजपविरोधी जे पक्ष असतील त्यांच्या आघाडीत आपण सामिल होऊ.

सध्या महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, मुस्लीम लीगसह दोन  पक्षांनी एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहे. ७५  जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. यात महाराष्ट्र बहुजन आघाडीने ३३ तर मुस्लीम लीगने १५  जागांची मागणी केली आहे. जर  आघाडीने आम्हाला जागा सोडल्या नाही तर आम्ही स्वतंत्र बैठक घेऊन आमचा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. 

या पत्रकार परिषदेला माने, मुस्लीम लीगचे जिल्हाध्यक्ष अब्दुल्ला डोणगावकर, सलाउद्दीन शेख, हकीम शेख, निजाम शेख आदी उपस्थित  होते.

..तर ‘मातोश्री’वर जाऊ !- प्रबोधनकारांच्या पोराने चूक केली आहे. मात्र नातवंडे सुधारत असतील तर आपल्याला ‘मातोश्री’वर जाण्यास आवडेल, असे माने यांनी सांगत आमचा लढा भाजपबरोबर आहे.एकवेळ आम्ही शिवसेनेसोबत बोलणी करू.कारण भाजप आणि शिवसेना हे दोन वेगळे पक्ष आहेत, असे त्यांनी सांगितले.

पाच जागांची मागणीमहाराष्टÑ बहुजन वंचित आघाडी आणि मुस्लीम लीगने जिल्ह्यातील ५ जागांची मागणी केली आहे.  यामध्ये मोहोळ, माळशिरस, दक्षिण अक्कलकोट मतदारसंघांचा समावेश आहे. तर दोन्ही पक्षांनी शहर मध्यची जागा मागितली आहे. यातील काही जागा काँंग्रेस-राष्ट्रवादीने द्याव्यात, असे माने यांनी म्हटले आहे. मध्य जागेवर  आम्ही एकत्र बसून तोडगा काढू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरlaxman maneलक्ष्मण मानेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण