शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
4
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
5
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
6
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
7
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
8
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
9
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
10
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
11
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
12
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
13
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
14
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
15
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
16
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
17
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
18
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
19
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
20
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता; मुलांना-आजोबांना मोबाईल नंबर पाठ; इतरांची स्मरणशक्ती मात्र अचाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 13:20 IST

गॅजेटवर अवलंबून राहणे मुख्य कारण : ज्येष्ठांना अनेक नंबर पाठ

सोलापूर : अनेकांच्या लक्षात स्वत:चे सोडून इतरांचे मोबाइल नंबर पाठ नसतात. मोबाइलसह इतर गॅजेटवर अवलंबून राहत असल्यामुळे हे घडत आहे. हातात आलेल्या मोबाइलने घड्याळ, टीव्ही, रेडिओ आपल्यात सामावून घेतलं असं म्हणतात. अलीकडे मात्र मोबाइलने आपल्या मेंदूचाही ताबा घेतलासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच मोबाइलही हल्ली जीवनावश्यक गरज बनून राहिली आहे. मागील काही दिवसांत कोणीही भेटलं किंवा नवीन ओळख झाली की त्यांचा नंबर नावाने मोबाइलमध्ये ठेवण्याची सवय जडली आहे. कोणाला फोन करायचं म्हटलं तर नावाने नंबर शोधून थेट डायल करण्याच्या सवयीने अनेकांना स्वत:च्या दुसऱ्या नंबरसह कुटुंबीयांचेही नंबर पाठ नसल्याचे पुढं आले आहे.

-------

असे का होते..?

  • 1 पूर्वी डायरीमध्ये नंबर लिहून ठेवण्याची प्रद्धत होती. आता जवळपास संपुष्टात आली आहे.
  • 2. लँडलाइनमध्ये फोन बुक नसल्याने सारखे डायल करून नंबर लक्षात राहत होता.
  • 3. आता स्मार्टफोन आल्यामुळे नंबर सेव्ह करण्यासाठी मेमरी अधिक मिळते. तसेच इंटरनेट व इमेलवरही कॉन्टॅक्टचा बॅकॲप ठेवता येतो. त्यामुळे नंबर विसरला तर काय याची काळजी राहिली नाही.

--------

हे टाळण्यासाठी...

कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याची प्रत्येकाची स्वतंत्र पद्धती आहे. दहा अंकी नंबरमधून काहींना दोन दोन अंक लक्षात ठेवून पूर्ण नंबर पाठ होऊ शकतो. काही जण मात्र पहिले आणि नंतरचे पाच आकडे ध्यानात ठेवून फोन नंबर पाठ करतात. अनेकांना नंबर पाठ करण्यापेक्षा तो वारंवार डायल केल्यानंतर लक्षात राहतो.

---------

मुलांना... आजोबाला नंबर्स पाठ, कारण...

आजोबा

पूर्वीपासून घरात साधा फोन वापरण्याची सवय असल्याने आजोबांच्या मेंदूला नंबर पाठ करण्याची सवय लागली आहे. डायरी आणि कॅलेंडरवर ते नंबर लिहितात. त्यातून पाहून नंबर डायल करण्याची सवय लागल्याने त्यांना अन्य कुटुंबीयांच्या तुलनेत सर्वाधिक नंबर पाठ असतात.

-----

बाबा/आई

बाबा हे कामावर जात असतात. त्यांच्याकडे स्मार्टफोन असतो. त्यामुळे ते यातच नंबर सेव्ह करतात. अनेकदा स्वत:चाच दुसरा नंबर अनेकांना पाठ नसतो. आई आणि बाबा यांना स्मार्टफोनची सवय असल्यामुळे त्यांच्या मोबाइलमध्ये नंबर सेव्ह असतात. त्यामुळे त्यांना पाठ होत नाही.

----

लहान मुलगा

घरातील लहान मुले तुलनेने कमी प्रमाणात मोबाइल वापरतात. पालक हे मुलांना त्यांचा व घरातील लँडलाइन नंबर पाठ करायला लावतात. त्यामुळे लहान मुलांच्या लक्षात नंबर राहतात.

---------

मोबाइलवर अवलंबून राहिल्यामुळे लक्षात ठेवण्याची कला आपण विसरत चाललो आहोत. एखादी बाब मनापासून आणि वारंवार केल्याने लक्षात राहते. तसेच नंबरचेही आहे. मोठे नंबर लक्षात ठेवत नसतील तर चालू शकते. मात्र, मुलांना तरी ही सवय नसायला हवी.

- डॉ. कुंदन कांबळे, मानसोपचार तज्ज्ञ, शासकीय रुग्णालय

*******

 

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलHealthआरोग्य