शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

आमचं ठरलंय...; मुलांचा जीव धोक्यात घालून शाळेत पाठविणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:51 IST

सोलापुरातील पालकांचा इरादा; आॅनलाईन शिक्षणासारख्या पर्यायाचा वापर व्हावा

ठळक मुद्देग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शाळा सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक शाळा, महाविद्यालये हे क्वारंटाईन केंद्र म्हणून घोषित केले आहेशिक्षण विभागाचे सद्यस्थितीतील शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला पालकांकडून विरोध केला जात आहे

सोलापूर : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़  यामुळे राज्य शासन लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता असताना मात्र सोमवारी शिक्षण विभागाच्या वतीने यंदा नेहमीप्रमाणे शैक्षणिक वर्ष सुरू करणार असल्याचा मानस जाहीर केला़  या निर्णयाला बहुतांश पालकांकडून विरोध करण्यात येत आहे़  जोपर्यंत कोरोनावर पूर्णत: इलाज सापडत नाही किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळणार नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही, असे मत पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्षण विभागाचे सद्यस्थितीतील शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला पालकांकडून विरोध केला जात आहे़  सध्या शहरातील अनेक भाग हे रेड झोनमध्ये आहेत़  या भागात शाळा, महाविद्यालयेही आहेत़  यामुळे त्या शाळेत विद्यार्थी जातील का, याचबरोबर जीव धोक्यात घालून शिक्षण शिकवणे योग्य आहे का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शाळा सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी आहेत़  ग्रामीण भागात शाळांमध्ये पटसंख्या जास्त आहे़  अशा वेळी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवता येणे कठीण आहे़  याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक शाळा, महाविद्यालये हे क्वारंटाईन केंद्र म्हणून घोषित केले आहे़  हीे केंद्रे रिकामी करण्यात अडचणीही आहेत.

मुलांचे शिक्षण हे महत्त्वाचे आहे. सोबतच त्यांचे आरोग्यही खूप महत्त्वाचे आहे़  यामुळे सद्यस्थितीत शाळा सुरू करणे, हे खूप गडबडीचे ठरू शकेल़  जर शासनाने या कालावधीत शाळा सुरू केल्या तर आम्ही मुलाच्या शिक्षणासाठी आरोग्य धोक्यात घालून शाळेला पाठवणार नाही.

- मनोज कुलकर्णी, पालक

सोलापूर शहरात रेड झोन आहे़  अशा भागात शाळा भरवणे हे चुकीचे आहे़  ग्रामीण भागात एक दिवसाआड शाळा सुरू करण्याचा नवा पर्याय आहे़  याचबरोबर सरकारी वाहिन्यांच्या माध्यमातून शाळा वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षणाचा विचार करावा किंवा सध्या आहे त्या साधनांचा उपयोग करून त्या माध्यमातून शिक्षण द्यावे़- तानाजी माने, शिक्षण तज्ज्ञ 

मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू होणे गरजेचे आहे. पण त्या आधी मुलांची आणि पालकांच्या मनाची पूर्णत: तयारी होणे गरजेचे आहे.  सध्या इतर देशात आठवड्यातून एक किंवा दोन दिवस शाळा सुरू केली जात आहे़  त्याप्रमाणे किंवा ट्यूशनसारख्या बॅचेसच्या माध्यमातून शाळा सुरू करता येतील़  याचबरोबर जर शाळा सुरू करायची असेल तर जूननंतरच करावी़  तोपर्यंत विद्यार्थ्यांचे नोट्स आणि शाळा स्वच्छता करण्यासाठीचा वेळ शिक्षक आणि कर्मचाºयांना मिळेल.- सायली जोशी, संस्थाचालक, आयएमएस

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाEducationशिक्षण