शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरावर जलसंकट; भाजपच्या दोन मंत्र्यांचे दुर्लक्ष, शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:16 IST

सोलापूर : उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. येथील मनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष ...

ठळक मुद्देउजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहेमनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षऔज बंधारा कोरडा पडला असून, शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्याबाबत भाजपच्या दोन्ही मंत्र्यांचे दुर्लक्ष

सोलापूर : उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. येथील मनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दुसरीकडे औज बंधारा कोरडा पडला असून, शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्याबाबत भाजपच्या दोन्ही मंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी  केला. 

शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी सकाळी महापालिकेच्या उजनी येथील पंपगृहाला भेट दिली. नगरसेवक राजकुमार हंचाटे, देवेंद्र कोठे, अमोल शिंदे, गुरुशांत धुत्तरगावकर, विनायक कोंड्याल, भारतसिंग बडूरवाले, उमेश गायकवाड, विठ्ठल कोटा, शशिकांत कैंची, युवा सेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल वानकर, रामदास मगर आदी उपस्थित होते. नगरसेवकांनी येथील कर्मचाºयांकडून कामकाजाची माहिती घेतली. या पाहणीत अनेक बाबतीत मनपा प्रशासनाची उदासीनता दिसून आली.

नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, उन्हाळ्याच्या तोंडावर सोलापूरवर मोठे जलसंकट येऊ शकते. शिवसेनेच्या नगरसेवकांनी याची कल्पना प्रशासनाला दिली होती. औज बंधारा कोरडा पडला आहे. टाकळी इनटेकमधील पाणी २५ मार्चपर्यंत पुरणार आहे. जलसंपदा विभागाने औजमधील पाणी १० एप्रिलपर्यंत पुरवावे, असे सांगितले. पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीत कमालीचा फरक आहे. कर्नाटकातील गावे दररोज ७० एमएलडी पाण्याचा उपसा करीत आहेत. मंद्रुप येथील पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी उपसा सुरू आहे. औज बंधारा कोरडा पडल्याने उजनी धरणातून वेळेवर पाणी सोडायला हवे. भाजपच्या दोन मंत्र्यांनी पाठपुरावा करायला हवा. पण तो केला जात नाही.  

‘अमृत’चे पंप बसविण्यास उशीर- उजनी पंपगृहातील सहापैकी चार पंप सुरू आहेत. दोन पंप पर्यायी पंप म्हणून ठेवले आहेत. कार्यरत असलेल्या दोन पंपांना मोठी गळती आहे. अमृत योजनेतून हे पंप बदलण्याचा निर्णय झाला. दोन महिन्यांपूर्वी पंप दाखल झाले आहेत; मात्र ते बदलण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने यापूर्वीच हे पंप बदलून पाणीपुरवठा सुरळीत करणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले नाही. हे काम लवकर झाले नाही तर शहराला मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागेल. पंपगृहाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. सदर सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. ही प्रशासनाची मोठी चूक आहे, असे शिवसेना नगरसेवक देवेंद्र कोठे म्हणाले.

उजनीतील पाणी कमी झाल्यानंतर दुबार पंपिंग केले जाते. त्यासाठी दरवर्षी ३० लाख रुपयांचा खर्च केला जातो. पण दुबार पंपिंगचे काम आणखी अर्धा किलोमीटर आत नेल्यास मनपा प्रशासनाचा खर्च वाचेल. पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. - राजकुमार हंचाटे, शिवसेना, नगरसेवक 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुख