शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागेच्या पात्रात पाणी पोहोचले

By admin | Updated: July 6, 2014 01:26 IST

स्नानाची सोय; खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने पात्र बनले धोकादायक

पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या स्नानाची सोय व्हावी, यासाठी उजनी धरणातून ३ हजार क्युसेक्स पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात आले असून, हे पाणी चंद्रभागा नदीपात्रामध्ये दाखल झाले आहे. यामुळे वारकऱ्यांना स्नान करणे सोयीचे झाले आहे.सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर पालखी सोहळा आल्यानंतर पंढरीत मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी झाली होती. काही वारकरी आषाढी आधी पंढरीत येऊन स्नान व दर्शन करून वारीत जाण्यासाठी पालख्यांना सामोरे जात होते; मात्र चंद्रभागा वाळवंटात पाणीच नसल्याने डबक्यात साचलेल्या पाण्यामध्ये त्यांना स्नान करावे लागत होते. यामुळे प्रशासनाने बुधवारी उजनी धरणातून तीन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीमध्ये सोडला असून, हे पाणी वाळू उपशाचे खड्डे व कोरड्या नदीतील भेगा भरत गुरसाळे, पंढरपूर बंधारा ओलांडून नवीन पूल, जुना दगडी पूल पार करून शनिवारी पहाटेच्या सुमारास चंद्रभागा वाळवंटात दाखल झाले आहे. यामुळे भाविकांना स्नान करणे सुलभ झाले असून, पाणी वाढत असल्याने होडीचालकांचीही मोठ्या प्रमाणात लगबग वाढली आहे.चंद्रभागा नदीमध्ये पाणी नसल्याने वाळू उपसा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचणार असल्याने स्नानासाठी नदीपात्रात जाणाऱ्या भाविकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने धोका पत्करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे प्रशासनाने पाणी येण्याआधीच वारकऱ्यांना याबाबत जनजागृती करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. ---------------------हळूहळू पाणी येऊ लागलेआठ ते दहा दिवसांपासून चंद्रभागा वाळवंटात पाणीच नव्हते. आता उजनीतून पाणी येत असून, हे पाणी पंढरपूर बंधाऱ्यातून हळूहळू सोडण्यात येत आहे. यामुळे चंद्रभागा नदीपात्रामध्ये पडलेले खड्डे भरून हे पाणी गोपाळपूरच्या दिशेने पुढे सरकत असून, वाळवंटात असलेल्या होडी चालविण्यासाठी होडीचालकांची लगबग सुरू झाली आहे.