वारी जगभर गेली, आता साजेसं पंढरपूरही बनवू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 07:09 AM2023-11-24T07:09:13+5:302023-11-24T07:09:50+5:30

फडणवीस : चंद्रभागा प्रदूषणमुक्त करणार

Wari has gone all over the world, now we will make Pandharpur as well, Fadanvis | वारी जगभर गेली, आता साजेसं पंढरपूरही बनवू

वारी जगभर गेली, आता साजेसं पंढरपूरही बनवू

लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : आमचं पंढरपूर लाखो वारकऱ्यांचे स्वागत करायला तयार असते. आमची वारी आता देशातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय वारी झाली आहे. त्याला साजेसं पंढरपूर आम्हाला तयार करता आले पाहिजे. पंढरपूर शहराचा विकास करताना कोणाला विस्थापित करायचं आहे, कोणाचं सगळंच घ्यायचं आहे, असे मुळीच नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मंदिर समितीकडून फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रभागेत येईल केवळ स्वच्छ पाणीच चंद्रभागा नदीदेखील निर्मल अविरतपणे वाहत राहिली पाहिजे, यासाठी नदी संवर्धनाच्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.  नदीपात्रात नदीकाठावरील सर्व गावांतून येणारे पाणी हे स्वच्छ करूनच नदीत येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,  मला विश्वास आहे की, पंढरपूरचं बदललेलं स्वरूप पाहण्याची संधीदेखील आपल्याला मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Wari has gone all over the world, now we will make Pandharpur as well, Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.