शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सामाजिक विषयात घुमतोय तरुणाईचा आवाज !

By appasaheb.patil | Updated: September 17, 2019 12:55 IST

सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सव; विद्यार्थ्यांची तयारी अंतिम टप्प्यात

ठळक मुद्देपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास गुरूवार १९ सप्टेंबरपासून प्रारंभयजमान महाविद्यालय लोकमंगलने संपूर्ण तयारी केलीलोकनृत्य, एकांकिका, पथनाट्ये, समूहगीत, समूहनृत्य, शास्त्रीय नृत्य, मातीकाम, नकला, लघुनाटिका आदींची अंतिम तयारी

सोलापूर : आर्थिक-सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांची दडपशाही, सरकारची अकार्यक्षमता, नोकरशाहीची चालढकल वृत्ती, धार्मिकतेचे स्तोम, भ्रष्टाचार, बेरोजगारी, पर्यावरणाचा प्रश्न आदी अनेक विषयांवर पथनाट्ये, एकांकिका सादर करून विद्यार्थी यंदाच्या युवा महोत्सवात जागृतीचे काम करणार असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास गुरूवार, १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे़ त्यादृष्टीने यजमान महाविद्यालय लोकमंगलने संपूर्ण तयारी केली आहे़ युवा महोत्सवात आपल्याच महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक यावा यासाठी मागील दोन ते तीन महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी सराव करीत आहेत.

लोकनृत्य, एकांकिका, पथनाट्ये, समूहगीत, समूहनृत्य, शास्त्रीय नृत्य, मातीकाम, नकला, लघुनाटिका आदींची अंतिम तयारी आता महाविद्यालयस्तरावर दिसून येत आहे़ यजमान लोकमंगल महाविद्यालयाने २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची सोय केली आहे़ यासाठी विविध रंगमंच उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती लोकमंगल महाविद्यालयाच्या सचिव अनिता ढोबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

बुर्लाने दिला सांघिकवर भर- राजेंद्र चौक परिसरात असलेल्या ए़ आऱ बुर्ला महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी यंदाच्या युवा महोत्सवात सांघिक कलाप्रकारात टॉप राहण्यासाठी बाजी लावली आहे़ सांघिक कलाप्रकारात यंदा महाविद्यालयाने लोकनृत्य, पथनाट्य, लघुनाटिका, एकांकिका, शोभायात्रेत आपल्या महाविद्यालयाची वेगळी ओळख ठेवण्यासाठी कंबर कसली आहे़ प्राचार्य डॉ़ राजेंद्र शेंडगे, सहायक प्राध्यापिका रजनी दळवी, प्रा़ तुकाराम शिंदे, प्रा़ शंकर भांजे, अतिष पाटोळे, श्रीनिवास कुडक्याल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी परिश्रम घेत आहेत़ 

‘एलबीपीएम’ वेधणार लक्ष- सात रस्ता परिसरातील रयत शिक्षण संस्था संचलित लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील २८ विद्यार्थिनींनी यंदा युवा महोत्सवात सर्वाधिक कलाप्रकारांत यजमान राहण्यासाठी कंबर कसली आहे़ यंदा महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी लोकनृत्य, समूहगीत, लघुनाटिकेवर जास्तीचा भर दिला आहे़ याशिवाय विविध कलाप्रकारांची तयारी जोमाने करीत आहेत़ मागील वर्षी महाविद्यालयास तीन पारितोषिके मिळाली होती़ यंदा अधिक पारितोषिके मिळविण्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करीत आहे़ यासाठी प्राचार्य डॉ़ दादासाहेब साळुंखे, उपप्राचार्य रावसाहेब ढवण, प्रा़ देवराव मुंढे यांच्यासह सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी परिश्रम घेत आहेत़ 

दयानंद विधी महाविद्यालय राहणार १५ कलाप्रकारांत टॉप- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत होणाºया युवा महोत्सवात यावर्षी डी़ जी़ बी़ दयानंद विधी महाविद्यालय मोठ्या जोमाने सहभागी होत आहे़ या महाविद्यालयातील एकूण १५ विद्यार्थी विविध कलाप्रकारांत सहभाग नोंदविणार आहेत़ यात वैयक्तिक व सांघिक कलाप्रकारांचा समावेश आहे़ सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा यावर भाष्य करणारी एकांकिका विद्यार्थ्यांनी बसविली आहे़ यासाठी महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर देवकुळे परिश्रम घेत आहे़ विधी महाविद्यालयाचे प्राचार्य यु़ मंगापती राव, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा़ कटप यांच्यासह प्रा़ रवींद्र चलवादी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर